महाराष्ट्रातील या 5 स्वातंत्र्य सेनानींनी मातृभूमीसाठी दिलाय लढा
Independence Day : येत्या 15 ऑगस्टला देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. या दिवशी मातृभूमीसाठी प्राणांची निधड्या धातीने आहुती दिलेल्या शूरवीरांना सलाम केला जातो. अशातच महाराष्ट्रातील काही स्वातंत्र्य सेनानींबद्दल जाणून घेऊया.
| Published : Aug 12 2024, 10:57 AM IST / Updated: Aug 12 2024, 04:19 PM IST
- FB
- TW
- Linkdin
भारताचा स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले हते. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. ‘विकसित भारत’ यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ठेवण्यात आली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अशातच महाराष्ट्रातील काही स्वातंत्र्य सेनानींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लढा देण्यासह आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण केले.
बाळगंगाधर टिळक
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे वाक्य ऐकल्यावर किंवा वाचल्यावर बाळगंगाधर टिळक यांची आठवण होते. बाळगंगाधार टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महान नेते होते. टिळकांनी भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची सुरुवात करण्यासह स्वातंत्र्यासाठी लढाई लढई. टिळकांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली होती. लोकमान्यांशिवाय टिळकांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक असेही म्हटले जाते. बाळगंगाधर टिळक यांनी इंग्रजीत ‘मराठा दर्पण’ आणि मराठीत ‘केसरी’ नावाची दोन दैनिके सुरु केली होती. ‘केसरी’ वृत्तपत्रातून टिळक इंग्रजांविरोधात आक्रमक लेख लिहियाचे. या लेखांमुळेच अनेकदा टिळकांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात 'सर्व्हंट्स ऑफ द इंडिया' सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेने अनेक शाळा, ग्रंथालये, उद्योग कामगार आणि रात्रीच्या वर्गांची स्थापना केली होती. गोपाळ कृष्ण गोखले एक थोर समाजसुधारक होते. याशिवाय गोपाळ कृष्ण यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात मध्यम राष्ट्रवादीचे नेतृत्व केले होते.
विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर एक थोर समाजसुधारक, लेख, हिंदू तत्वज्ञ होते. सावरकरांनी ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ आपली कुलदेवता भगवती पुढे घेतली होती. यानंतर सावरकरांनी स्वत:ला देशकार्यासाठी वाहून घेतले होते. याशिवाय सावरकरांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ नावाची एक गुप्त संघटना आपल्या साथीदारांसोबत स्थापन केली होती. या संस्थेचे कालांतराने रुपांत अभिनव भारत संघटनेमध्ये झाले होते. एवढेच नव्हे पुण्यात इ.स. 1905 मध्ये विदेशी कापडांची होळी केली होती.
राजगुरू
वयाच्या 22 व्या वर्षी राजगुरूंनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. राजगुरू यांचा जन्म पुण्यातील खेडा या गावात झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षापासून संस्कृतचे शिक्षण घेण्यासाठी राजगरू वाराणसी येथे गेले. येथूनच स्वातंत्र्य चळवळीकडील राजगुरूंचा ओढा वाढला गेला. वयाच्या 16 व्या वर्षी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत राजगुरूंची भेट घडली होती. यानंतर ब्रिटिसांच्या सायमन कमीशनचा विरोध करताना लाठीचार्जमध्ये लाला लाजपतराय शहीद झाले होते. त्यांच्याच हत्येचा बदला घेण्यासाठी 9 डिसेंबर 1928 रोजी राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्याकर अन्य क्रांतिकाऱ्यांनी कट रचला होता. यानंतर लाहोरमध्ये सँडर्सची हत्या केली.
विनोबा भावे
विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रामुख्याने नाव घेतले जाते. भारतीय भुदान चळवळ विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली होती. खरंतर, महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेत विनोबा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि संपूर्ण जीवन मातृभूमीसाठी समर्पित केला. महात्मा गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांमध्ये देखील विनोबा भावे यांनी सहभाग घेतला होता. सुर्योदयाचा नेता अशी विनोबा भावे यांची ओखळ बनली होती.
आणखी वाचा :
स्वातंत्र्य दिनावरील निबंध: विद्यार्थ्यांसाठी 78 व्या वर्धापनदिनानिमित्त 5 Essay
इंकलाब झिंदाबाद ते भारत छोडोपर्यंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 20 प्रसिद्ध घोषणा