MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Chapati Dough : चपातीची कणीक मळल्यावर लगेच काळी का पडते? ताजं ठेवण्यासाठी काय करावं?

Chapati Dough : चपातीची कणीक मळल्यावर लगेच काळी का पडते? ताजं ठेवण्यासाठी काय करावं?

चपातीची कणीक आधीच मळून फ्रिजमध्ये ठेवली तरी ती काळी पडते का? मग ती कणीक फेकून द्यावी लागते का? मुळात कणीक काळी का पडते आणि यामागचं नेमकं कारण काय आहे, ते आपण जाणून घेऊया.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 21 2026, 05:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
चपातीची कणीक काळी पडतेय का?
Image Credit : AI Image

चपातीची कणीक काळी पडतेय का?

वेळ वाचवण्यासाठी अनेक जण आधीच कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात. पण थोड्या वेळाने पोळ्या करण्यासाठी ती बाहेर काढली, की तिचा रंग बदलतो आणि ती काळी किंवा गडद रंगाची होते. बहुतांश लोक मळलेली कणीक फ्रिजमध्येच ठेवतात. पण ती योग्य पद्धतीने साठवली नाही, तर तिचा फक्त रंगच नाही, तर चव आणि वासही बदलतो. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही कणीक जास्त काळ ताजी ठेवू शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
कणीक काळी पडण्यामागचं नेमकं कारण काय?
Image Credit : AI Image

कणीक काळी पडण्यामागचं नेमकं कारण काय?

कणीक मळताना त्यात असलेले 'पॉलीफेनॉल ऑक्सिडेस' (Polyphenol oxidase) सारखे नैसर्गिक एन्झाइम्स हवेतील ऑक्सिजनसोबत रिअॅक्ट होतात. या प्रक्रियेला 'ऑक्सिडेशन' म्हणतात. यामुळेच वेळेनुसार कणकेचा रंग बदलतो. हवा लागल्यामुळे ही रासायनिक प्रक्रिया वेगाने होते आणि कणकेचा रंग व ताजेपणा खराब होतो.

कणीक काळी पडू नये म्हणून ती कशी मळावी?

कणीक मळताना पाणी थोडं-थोडं घालावं. एकदम जास्त पाणी घातलं तर कणीक चिकट होते. पोळ्या मऊ होण्यासाठी कणीक किमान ५ ते १० मिनिटे चांगली मळून घ्यावी. पाण्यासोबत थोडं दूध मिसळून कणीक मळली, तर ती जास्त वेळ मऊ राहते. शिवाय तिचा रंगही बदलत नाही आणि पोळ्यांचं टेक्सचरही छान येतं.

Related Articles

Related image1
Pressure Cooker Cleaning : कुकर धुताय? मग या रबर गॅस्केटला नक्की तपासा, नाहीतर मोठी अडचण येऊ शकते
33
कणीक ताजी ठेवण्याच्या सोप्या टिप्स:
Image Credit : AI

कणीक ताजी ठेवण्याच्या सोप्या टिप्स:

एअरटाइट कंटेनर - कणीक मळल्यानंतर ती उघडी ठेवू नका. हवा लागणार नाही अशा एअरटाइट डब्यात ती ठेवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि कणीक लवकर काळी पडत नाही.

क्लिंग फिल्म किंवा ॲल्युमिनियम फॉइल - तुमच्याकडे एअरटाइट डबा नसेल, तर एका भांड्यात कणीक ठेवून त्यावर ॲल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळा. हे हवेपासून संरक्षण करतं.

तूप किंवा तेल लावा - कणीक मळल्यानंतर त्यावर थोडं तूप किंवा तेल लावा. यामुळे वरचा थर कोरडा पडत नाही आणि हवेचा संपर्क तुटल्याने कणीक मऊ व ताजी राहते.

झिपलॉक बॅग - कणकेला थोडं तेल लावून ती झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. बॅग सील करण्यापूर्वी आतली हवा पूर्णपणे बाहेर काढा आणि मगच ती फ्रिजमध्ये ठेवा.

गरजेपुरतीच कणीक मळा - तुम्हाला जेवढी गरज आहे, तेवढीच कणीक मळा. कमी प्रमाणात मळल्यास ती ताजी राहते, वाया जात नाही आणि साठवायलाही सोपी जाते.

या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर चपातीची कणीक काळी पडणार नाही आणि नेहमी मऊ व ताजी राहील.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026: नवरात्रीत घर सजवायचंय? तोरण आणि रांगोळीच्या डिझाईनसाठी हे ५ AI प्रॉम्प्ट्स नक्की ट्राय करा
Recommended image2
Food Safety : सणांनंतर उरलेली मिठाई आणि फराळ असाच ठेवताय? जीवावर बेतू शकतं!
Recommended image3
Used Cooking Oil : एकदा वापरलेलं तेल किती दिवस टिकतं? जाणून घ्या FSSAI चे नियम!
Recommended image4
Poha Cutlet Recipe : दुकानासारखे कुरकुरीत पोह्यांचे कटलेट घरीच बनवा, पाहा सोपी रेसिपी
Recommended image5
Nail Polish Hack : नेलपेंट सुकलीय? फक्त १-२ थेंब टाका आणि पुन्हा नवीनसारखं वापरा
Related Stories
Recommended image1
Pressure Cooker Cleaning : कुकर धुताय? मग या रबर गॅस्केटला नक्की तपासा, नाहीतर मोठी अडचण येऊ शकते
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved