सार
भारतीय संस्कृतीत तुळशीला विशेष स्थान आहे. मात्र, विज्ञानही तिच्या औषधी गुणधर्मांची पुष्टी करते. घराच्या अंगणात तुळस लावल्यास केवळ धार्मिक लाभच नाही, तर अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.
हवा शुद्ध करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तुळस प्रभावी आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, तुळस वातावरणातील हानिकारक विषाणू आणि बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करते. तसंच, दिवसभर ऑक्सिजन सोडत असल्यामुळे तुळशीच्या सान्निध्यात राहणं फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरतं.
डास आणि कीटकांपासून संरक्षण तुळशीच्या पानांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे डास आणि इतर हानिकारक कीटक दूर राहतात. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांपासून बचाव होतो.
तणाव कमी करणारा सुगंध तुळशीच्या झाडातून निघणारा मंद सुवास तणाव कमी करतो आणि मानसिक शांतता मिळवतो. योग व ध्यानधारणा करताना तुळशीजवळ बसल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
आयुर्वेदिक गुणधर्माने भरलेली वनस्पती तुळशीचा काढा किंवा पानं चावल्यास सर्दी, खोकला, दम्यासारखे आजार दूर होतात. तसेच, पचनसंस्थेसाठीही तुळस फायदेशीर आहे.
वास्तुशास्त्र आणि धार्मिक महत्त्व वास्तुशास्त्रानुसार, घराच्या आग्नेय किंवा ईशान्य दिशेला तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्यानं नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि घरात शांती नांदते.
तुमच्या घरात तुळस आहे का? जर अजून तुळशीचं झाड लावलं नसेल, तर आजच लावा आणि तिच्या आरोग्यदायी लाभांचा अनुभव घ्या. स्वच्छ पर्यावरण, चांगलं आरोग्य आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी तुळशीपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही!