MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Weekly Horoscope : 12 राशींचे साप्ताहिक भविष्य... या आठवड्यात कुणाला राजयोग? कुणाचा कठीण काळ?

Weekly Horoscope : 12 राशींचे साप्ताहिक भविष्य... या आठवड्यात कुणाला राजयोग? कुणाचा कठीण काळ?

Weekly Horoscope: हे साप्ताहिक राशीभविष्य २९.११.२०२६ ते ५.१२.२०२६ या काळासाठी आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, आणि मीन राशींचे या आठवड्याचे भविष्य इथे जाणून घ्या.

4 Min read
Author : Karishma R
Published : Nov 29 2026, 12:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
या आठवड्याचे राशीभविष्य
Image Credit : AI

या आठवड्याचे राशीभविष्य

हे साप्ताहिक राशीभविष्य पंचांगकर्ते फणीकुमार देत आहेत. या आठवड्यात कोणत्या राशीला काय फळ मिळेल?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
213
मेष राशीभविष्य
Image Credit : Getty

मेष राशीभविष्य

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना संमिश्र फळ मिळेल. तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. व्यापाऱ्यांनी नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घेणे उत्तम. कुटुंबात छोट्या कारणांवरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक खर्च वाढण्याची चिन्हं आहेत. प्रेमसंबंधांत घाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याची योग्य काळजी घ्या. नवीन कल्पना आणि प्रयत्नांची आवड निर्माण होईल.

Related Articles

Related image1
Zodiac Signs : शब्दात व्यक्त होणं जमत नाही; पण कृती, जबाबदारीतून जीवापाड प्रेम करणाऱ्या ५ राशी
313
वृषभ राशीभविष्य
Image Credit : Getty

वृषभ राशीभविष्य

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंध, आर्थिक बाजू आणि नोकरीच्या दृष्टीने अनुकूल आहे. पूर्वी सुरू केलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरदार आपली जबाबदारी चोख पार पाडतील. व्यवसायात नवीन ओळखी उपयोगी पडतील. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. वैवाहिक आयुष्यात छोटे गैरसमज झाले तरी बोलून सोडवता येतील. पैशांच्या बाबतीत दुसऱ्यांना जामीन राहू नका. अनावश्यक खरेदी टाळा.

413
मिथुन राशीभविष्य
Image Credit : Getty

मिथुन राशीभविष्य

कामाचा थोडा ताण असला तरी मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात चांगले निकाल मिळतील. नोकरीत तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांची जुनी उधारी वसूल होऊ शकते. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. भावंडांशी बोलताना जपून बोला. महत्त्वाचे निर्णय नीट विचार करूनच घ्या. पैशांची बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा.

513
कर्क राशीभविष्य
Image Credit : Getty

कर्क राशीभविष्य

कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात कुटुंब, नोकरी आणि आर्थिक बाबतीत सावध पावलं टाकावीत. नोकरीत नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे. तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली तरी घाई न करता काम करा. व्यवसायात नफा मिळायला थोडा वेळ लागू शकतो. घरच्यांच्या आरोग्यासाठी किंवा गरजांसाठी खर्च वाढू शकतो. प्रेमीयुगुलांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अध्यात्माकडे कल वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

613
सिंह राशीभविष्य
Image Credit : Getty

सिंह राशीभविष्य

या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मतांचा आदर केला जाईल. पण सहकाऱ्यांशी उगीच स्पर्धा करू नका. व्यापाऱ्यांनी नवीन करार करताना सर्व तपशील तपासावेत. उत्पन्न असले तरी खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरात छोट्या गोष्टींचा बाऊ न करता संयमाने वागा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ द्या.

713
कन्या राशीभविष्य
Image Credit : Getty

कन्या राशीभविष्य

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत प्रगती दिसेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. घरात आनंदाचं वातावरण असेल. मित्रांची साथ मिळेल. आर्थिक बचत करू शकाल. पण दुसऱ्यांचं ऐकून गुंतवणूक करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल.

813
तूळ राशीभविष्य
Image Credit : Getty

तूळ राशीभविष्य

तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. इतरांसोबतचे संबंध सुधारतील. नोकरीत तुमच्या कष्टाचं चीज होईल. व्यापाऱ्यांना नफा होण्याची शक्यता आहे. नव्या ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. घरात शुभकार्याबाबत चर्चा होईल. प्रेमींसाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पैसे देणे-घेणे या बाबतीत विचार करून निर्णय घ्या.

913
वृश्चिक राशीभविष्य
Image Credit : Getty

वृश्चिक राशीभविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात या आठवड्यात महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द वाढेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाने तुम्ही वरिष्ठांना खूश करू शकाल. मात्र सहकाऱ्यांसोबत वाद घालू नका. व्यापाऱ्यांनी नवीन निर्णय घेण्यापूर्वी नफा-तोटा तपासावा. घरातील काही गोष्टींमुळे चिंता वाटली तरी संयमाने त्या सोडवा. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

1013
धनु राशीभविष्य
Image Credit : Getty

धनु राशीभविष्य

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. नोकरीत नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. व्यापारी नवीन लोकांशी ओळखी वाढवतील. उत्पन्न चांगलं असलं तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. दूरच्या प्रवासासाठी आधीच नियोजन करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमसंबंधांत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

1113
मकर राशीभविष्य
Image Credit : Getty

मकर राशीभविष्य

मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन संधींचे दरवाजे उघडतील. वैयक्तिक ध्येय आणि भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करतील. मात्र घाईघाईने गुंतवणूक करणं योग्य नाही. घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा दिसेल. मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील. आरोग्याकडे लक्ष द्या.

1213
कुंभ राशीभविष्य
Image Credit : Getty

कुंभ राशीभविष्य

कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात काही गोष्टी अनुकूल असतील, तर काहींबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कामं वेळेवर पूर्ण केल्यामुळे तुमचं नाव होईल. व्यवसायात काही बदल कराल. फालतू खर्च कमी करा. वैयक्तिक विचार आणि दीर्घकालीन योजनांमध्ये बदल होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने राहा. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

1313
मीन राशीभविष्य
Image Credit : Getty

मीन राशीभविष्य

मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची आहे. कामाला उशीर झाला तरी निराश होऊ नका. नोकरदारांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. वरिष्ठांशी बोलताना संयम बाळगा. व्यापाऱ्यांनी नवीन गुंतवणुकीबाबत घाई करू नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तीने अभ्यास केल्यास चांगले निकाल मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Vastu Tips : पती-पत्नीमध्ये भांडण होतंय? दरवाज्यामागे कपडे अडकवणं लगेच थांबवा
Recommended image2
Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांच्या मते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या 5 राशींना लॉटरी, आर्थिक फायदा
Recommended image3
Winter Skincare : हिवाळ्यात 97 वर्ष जुनी 'ही' क्रीम देईल लोण्यासारखी मऊ त्वचा
Recommended image4
Oats Benefits : रोज एकदा ओट्स खाल्ल्यास शरीरात होतात हे 7 बदल
Recommended image5
Daily Horoscope : आज 'या' राशीच्या लोकांना मिळणार बहुप्रतीक्षित संधी, कोणाचा रविवार कसा जाईल?
Related Stories
Recommended image1
Zodiac Signs : शब्दात व्यक्त होणं जमत नाही; पण कृती, जबाबदारीतून जीवापाड प्रेम करणाऱ्या ५ राशी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved