Trending 3 Gram Gold Dangle Earring Designs for a Stylish Look : रोजच्या वापरासाठी तुम्ही डँगल इअररिंग्स शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास डिझाइन्स घेऊन आलो आहोत. फक्त ३ ग्रॅम सोन्यात बनवलेले हे वजनाला हलके पण दिसायला आकर्षक इअररिंग्स तुम्हाला एक एलिगंट आणि स्टायलिश लूक देतील.

Trending 3 Gram Gold Dangle Earring Designs for a Stylish Look : डँगल इअररिंग्स म्हणजे कानातून खाली लटकणारे आणि हलणारे कानातले. हे दिसायला स्टड्स किंवा साध्या रिंगपेक्षा जास्त स्टायलिश आणि आकर्षक वाटतात. त्यामुळे तुम्ही हे रोजच्या वापरासाठी, पार्टी, लग्न किंवा कोणत्याही खास कार्यक्रमासाठी घालू शकता. विशेष म्हणजे, हे कानातले इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर छान दिसतात. चला तर मग, पाहूया याच्या काही लेटेस्ट डिझाइन्स...

बाली डिझाइन डँगल इअररिंग्स

रोजच्या वापरासाठी तुम्ही सोन्याच्या बाली डिझाइनमधील हा पॅटर्न निवडू शकता. यामध्ये दोन चेन्स लटकलेल्या असून खाली छोटे स्टार्स दिलेले आहेत. रोजच्या वापरासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

गोल्ड डँगल इअररिंग्स डिझाइन

अडीच ते ३ ग्रॅम सोन्यामध्ये तुम्ही असे वजनाला हलके कानातले बनवून घेऊ शकता. यात पानांच्या आकाराचं (लीफ पॅटर्न) डिझाइन असून खाली दोन चेन्सना सोन्याचे मणी लावलेले आहेत.

सुई-धागा स्टाइल डँगल इअररिंग्स

आजकाल सुई-धागा स्टाइलच्या कानातल्यांचा ट्रेंड पुन्हा एकदा वाढला आहे. यामध्ये समोरच्या बाजूला स्टड पॅटर्न असतो आणि मागच्या बाजूला एक चेन असते. यामुळे चेहऱ्याला एक 'लिफ्टेड लूक' मिळतो आणि छोटा चेहरादेखील उंच दिसण्यास मदत होते.

फ्लोरल डिझाइन डँगल इअररिंग्स

डँगल गोल्ड इअररिंग्समध्ये तुम्ही छोट्या फुलांच्या स्टडसोबत चेन असलेलं डिझाइन निवडू शकता. याशिवाय, पानाफुलांचं डिझाइनही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

बटरफ्लाय डिझाइन डँगल इअररिंग्स

आजकाल क्युट आणि एलिगंट लूकसाठी बटरफ्लाय डिझाइनचे डँगल इअररिंग्स खूप पसंत केले जात आहेत. यामध्ये फुलपाखराच्या आकाराखाली तीन चेन्स लटकलेल्या असतात. तुम्ही अशा मल्टी-स्ट्रिंगवाल्या कानातल्यांची निवडही करू शकता.