घराला वाळवी लागलीय? हा मसाला करेल मदत

| Published : Oct 03 2024, 08:57 AM IST / Updated: Oct 03 2024, 08:58 AM IST

Termite home remedy

सार

घराला वाळवी लागल्यानंतर सर्व वस्तूंचे नुकसान होते. याशिवाय पेस्ट कंट्रोल किंवा त्यावरील औषध लावल्याशिवाय वाळवी पूर्णपणे जात नाही. अशातच वाळवी लागल्यानंतर लवंग तुमच्या कामी येऊ शकते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Home remedy for Termite : पावसाला, दमटपणा किंवा ओलसरपणामुळे घरात वाळवी लागण्याची समस्या उद्भवते. घराला वाळवी लागण्यासाठी विशिष्ट ऋतू नसतो. पण यामागील मोठे कारण म्हणजे ओलसरपणा आहे. घराला एकदा वाळवी लागल्यानंतर यापासून सुटका मिळवणे कठीण होऊन जाते. कारण फर्निचरसह घराच्या भिंतीही वाळवी पोकळ करते. यामुळे वाळवीच्या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक असतात. अन्यथा महागडे फर्निचरही वाळवी खराब करु शकते. वाळवीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग (Clove) तुमच्या नक्कीच कामी येऊ शकते.

लवंगचा वाळवीच्या समस्येवर उपाय
घरात वाळवी लागली असल्यास लवंगाचा वापर करू शकता. याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो.

लवंगाची पावडर
घरातील वाळवी दूर करण्यासाठी लवंग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर पावडर अशा ठिकाणी स्प्रे करा जेथे वाळवी लागली आहे. यामुळे वाळवीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लवंगाचे तुकडे
लवंगाच्या पावडरसह काही तुकडेही वाळवीची समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाच्या पावडरसोबत अख्खी लवंगही ठेवा.

लवंगाचे तेल
वाळवीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचे तेलही कामी येईल. याचे तेल मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. लवंगाचे तेल पाण्यात मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरा.वाळवी लागलेल्या ठिकाणी लवंगाचे तेल स्प्रे करा. लवंगाच्या वासामुळे वाळवी निघून जाण्यास मदत होईल.

याशिवाय लवंगाचे तेल लाकडाचे फर्निचर, कपाट, भिंती आणि अन्य ठिकाणीही स्प्रे करुन ठेवा. ज्या-ज्या ठिकाणी वाळवी पसरू शकते तेथे लवंगाचे तेल स्प्रे करून ठेवा. लक्षात ठेवा की, लवंगाचे तेल आणि पाण्याचे लिक्विडचा स्प्रे सातत्याने दोन ते तीन दिवस करावा लागेल. यामुळे वाळवी हळूहळू दूर होण्यास मदत होईल.

या गोष्टींही लक्षात ठेवा
घरात वाळवी लागण्यामागील मोठे कारण म्हणजे ओलसरणा आहे. पावसाळ्यात दिवसात किंवा घरात पाण्याचे लिकेज होत असल्यास वाळवी लागण्याची अधिक शक्यता असते. अशातच ओलसरपणा घरात ज्या ठिकाणी आहे तेथे वेळीच उपाय करा.

आणखी वाचा : 

लिंबाची साले फेकून देण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा त्रास का का होतो? हार्मोनमध्ये असतो बदल