- Home
- lifestyle
- Acidity Remedy : गॅस, अॅसिडिटीने हैराण? सकाळी रिकाम्या पोटी हा काढा प्या, पोट राहील साफ
Acidity Remedy : गॅस, अॅसिडिटीने हैराण? सकाळी रिकाम्या पोटी हा काढा प्या, पोट राहील साफ
आजकाल अनेकजण अॅसिडिटी, पोट फुगणे आणि गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत. या पचनाच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या आलं आणि धण्यापासून बनवलेला एक सोपा घरगुती उपाय जाणून घेऊया.

पोट फुगण्यावर सोपा उपाय
आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची आहारपद्धती आणि जंक फूडच्या सेवनामुळे गॅस्ट्रिक, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याची (गॅस) समस्या सामान्य झाली आहे. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आलं आणि धण्यापासून बनवलेला हा सोपा घरगुती उपाय करून पाहा.

आहारातील छोटे बदल
काय साहित्य लागेल?
लागणारे साहित्य - धणे (अख्खे) - १ चमचा आलं - १ छोटा तुकडा मध - अर्धा चमचा पाणी - १ ग्लास
काढा बनवण्याची पद्धत
बनवण्याची पद्धत -
सर्वात आधी एका पॅनमध्ये एक चमचा धणे हलके भाजून घ्या. नंतर, भाजलेले धणे एका चहाच्या भांड्यात टाका. त्यात एक ग्लास पाणी आणि ठेचलेलं आलं घालून मिश्रण चांगलं उकळवा. ३-४ मिनिटं उकळल्यास उत्तम. पाण्याला चांगली उकळी आल्यावर ते गाळून घ्या आणि कोमट होऊ द्या. या कोमट काढ्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळा.
कसे आणि केव्हा प्यावे?
सेवन करण्याची पद्धत आणि फायदे -
हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात फायदेशीर आहे. हा काढा २-३ दिवस नियमित प्यायल्यास अॅसिडिटी, गॅस आणि पोटदुखीची समस्या बऱ्यापैकी कमी होते. धणे आणि आल्यामधील पाचक गुणधर्म पोटात थंडावा निर्माण करतात आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.
आरोग्यदायी फायदे
सेवन करण्याची पद्धत आणि फायदे -
हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात फायदेशीर आहे. हा काढा २-३ दिवस नियमित प्यायल्यास अॅसिडिटी, गॅस आणि पोटदुखीची समस्या बऱ्यापैकी कमी होते. धणे आणि आल्यामधील पाचक गुणधर्म पोटात थंडावा निर्माण करतात आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.
ही काळजी नक्की घ्या
काळजी घ्या -
कोणताही घरगुती उपाय प्रमाणातच करावा, अतिसेवन टाळा. उकळत्या पाण्यात किंवा खूप गरम असताना मध घालू नका. पाणी कोमट झाल्यावरच मध घालावा. धणे जास्त काळे होऊ न देता हलकेच भाजल्यास काढ्याची चव आणि गुणवत्ता चांगली राहते.
(सूचना - ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. गंभीर गॅस्ट्रिक किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.)

