- Home
- lifestyle
- Shravan Special Daily Horoscope July 25 : आज शुक्रवारचे राशिभविष्य, या राशीच्या नोकरदारवर्गाने काळजी घ्या!
Shravan Special Daily Horoscope July 25 : आज शुक्रवारचे राशिभविष्य, या राशीच्या नोकरदारवर्गाने काळजी घ्या!
मुंबई - आजचे तुमचे राशिभविष्य जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. हे भविष्य २५.०७.२०२५ शुक्रवारचे आहे. वाचा तुमच्या नशिबात आज नेमके काय लिहिले आहे.

मेष राशीचे भविष्य
दुसऱ्यांशी वाद मिटतील. मनाला समाधान लाभेल. दूरच्या नातेवाईकांकडून शुभ बातमी मिळेल. अचानक धनलाभ होईल. हातात पैसा येईल. मित्रांकडून महत्त्वाच्या गोष्टी कळतील. प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवाचे नवीन योग येतील. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. नोकरीत बढती मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ राशीचे भविष्य
प्रवासात श्रम वाढेल. नातेवाईकांशी वाद होऊ शकतो. त्यांच्याशी बोलताना जपून बोला. जपून शब्द वापरा. कामे रखडतील. पण चिंता नको, हे काही काळासाठी असेल. आर्थिक परिस्थिती गोंधळलेली असेल. आजारपण जाणवेल. जरा काळजी घ्या. व्यवसाय, नोकरी सामान्य राहतील. कर्जाचा ताण वाढेल.
मिथुन राशीचे भविष्य
देवपूजेत सहभागी व्हाल. घरात धार्मिक कार्य होईल. कौटुंबिक वातावरण शांत असेल. आजारपणापासून आराम मिळेल. नवीन कामे सुरू होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची अडचण जाणवणार नाही. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जरा मेहनत करावी लागेल. नोकरीतील जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल.
कर्क राशीचे भविष्य
घरात-बाहेर गोंधळाचे वातावरण असेल. पण याचा तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ देऊ नका. आर्थिक ताण वाढेल. त्याचे दडपण आल्यासारखे होईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होतील. आरोग्याची काळजी घ्या. कामात श्रम वाढेल. दूरच्या प्रवासात अडचणी येतील. त्या दूरही होतील. नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे त्रास होईल.
सिंह राशीचे भविष्य
वाहन खरेदीचे प्रयत्न यशस्वी होतील. घरात नवीन वस्तू आल्याने चैतन्याचे वातावरण तयार होईल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरात-बाहेर आश्चर्यकारक गोष्टी कळतील. गरजेच्या वेळी जवळच्या लोकांकडून मदत मिळेल. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. भावंडांकडून शुभ बातमी मिळेल. नोकरीत अपेक्षित प्रगती होईल. मनासारखे घडेल.
कन्या राशीचे भविष्य
समाजात मान्यवरांशी ओळख वाढेल. सोशल कनेक्ट वाढल्याचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात फायदा होईल. आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात नफा मिळेल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जमीनविषयक वाद मिटतील. संपत्तीत भर पडेल. नोकरीचे वातावरण अनुकूल असेल.
तूळ राशीचे भविष्य
आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. पैसा येणार नाही आणि जाणारही नाही. अचानक प्रवासाची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यामुळे त्रास होईल. वागताना, बोलताना जपून काम करा. कामे पुढे सरकणार नाहीत. व्यवसाय वाढवण्यात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांचा राग सहन करावा लागेल. त्यांचे मन जिंकायचा प्रयत्न करा.
वृश्चिक राशीचे भविष्य
जमिनीचे वाद त्रास देतील. भावंडांशी अनपेक्षित वाद होतील. पण त्याचे दडपण येईल असे होऊ देऊ नका. मानसिक अशांतता जाणवेल. प्रवास टाळणे चांगले. फारच महत्त्वाचे असेल तर प्रवास करा. महत्त्वाच्या कामात मेहनत करूनही फळ मिळणार नाही. पण निराश होऊ नका. व्यवसाय सामान्य राहतील. नोकरीत निराशेचे वातावरण असेल.
धनु राशीचे भविष्य
जमीन खरेदीतील अडथळे दूर होतील. आप्तेष्टांकडून शुभ बातमी मिळेल. व्यवसायाबाबत मोठ्यांचा सल्ला घेणे चांगले. सल्ला घेऊनच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. हाती घेतलेली कामे उत्साहाने पूर्ण कराल. जवळच्या लोकांशी सख्य राहील. व्यवसाय, नोकरीतील अतिरिक्त जबाबदाऱ्यांपासून सुटका मिळेल. देवाचे चिंतन वाढेल. देवाचे ध्यान करा.
मकर राशीचे भविष्य
मौल्यवान वस्त्रे, दागिने खरेदी कराल. घरबांधणीबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. राजकीय क्षेत्रातील लोकांकडून निमंत्रणे मिळतील. कामात यश मिळेल. मालमत्तेच्या वादात नवे करार होतील. व्यवसाय, नोकरी व्यवस्थित चालेल. बेरोजगारांचे स्वप्न पूर्ण होतील.
कुंभ राशीचे भविष्य
नातेवाईकांशी जमिनीचे वाद होतील. विचार स्थिर राहणार नाहीत. व्यवसाय मंद गतीने चालेल. कामात अडथळे येतील. नवीन कर्जे घ्याल. अचानक प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत अनपेक्षित समस्या येतील. देवाचे चिंतन वाढेल.
मीन राशीचे भविष्य
नोकरीवाल्यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत काळजी घ्यावी. वरिष्ठांशी वाद टाळणे चांगले. प्रवास पुढे ढकलावा लागेल. जुने आजार त्रास देतील. आर्थिक बाबी गोंधळलेल्या असतील. कामे अर्धवट राहतील. व्यवसाय मंद गतीने चालेल. देवकार्यात लक्ष लागेल.

