Redmi Note 15 5G and Pad 2 Pro Launched : Redmi Note 15 5G आणि Redmi Pad 2 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत. त्यांचे कॅमेरा, बॅटरी, चिप, डिस्प्ले इत्यादी वैशिष्ट्ये आणि किंमत तपशीलवार दिली आहे. 

Redmi Note 15 5G and Pad 2 Pro Launched : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने भारतात आपले Redmi Note 15 5G आणि Redmi Pad 2 Pro लाँच केले आहेत. Redmi Note 15 5G स्मार्टफोन 5,520 mAh बॅटरी क्षमता आणि 108-मेगापिक्सल रिअर कॅमेरासह भारतीय बाजारात दाखल झाला आहे. तर, Redmi Pad 2 Pro 5G मध्ये 12,000 mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि Snapdragon 7s Gen 4 SoC देण्यात आला आहे. चला, या दोन्ही उपकरणांची वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Scroll to load tweet…

Redmi Note 15 5G ची वैशिष्ट्ये

Redmi Note 15 5G स्मार्टफोन गोलाकार कॅमेरा मॉड्यूलसह येतो. फक्त 7.35mm जाडी असलेल्या या फोनला सुरक्षेसाठी IP66 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये 3,200 निट्स आणि 120Hz सह 6.77-इंचाचा कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, Qualcomm चा Snapdragon 6 Gen 3 चिपसेट, UFS 2.2 स्टोरेज, 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 30fps वर 4K रेकॉर्डिंग, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सल सेन्सर, 5,520 mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग ही Redmi Note 15 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. Redmi Note 15 5G ची विक्री 9 जानेवारीपासून सुरू होईल. Redmi Note 15 च्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आणि 8GB/256GB बेस मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. Xiaomi ने 3,000 रुपयांची बँक ऑफर देखील जाहीर केली आहे.

Scroll to load tweet…

Redmi Pad 2 Pro ची वैशिष्ट्ये आणि किंमत

Redmi Pad 2 Pro चौकोनी आकारात असून त्याचे वजन 610 ग्रॅम आणि जाडी 7.5mm आहे. यात 12,000 mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. या बॅटरीसोबत Redmi 33W फास्ट चार्जिंग देत आहे. Redmi Pad 2 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 12.1 QHD+ डिस्प्ले, डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट आणि क्वाड-स्पीकर सेटअप आहे. Redmi Pad 2 Pro मध्ये Snapdragon 7s Gen 4 SoC सह 5G सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi Pad 2 Pro च्या Wi-Fi सपोर्ट असलेल्या 8GB + 128GB बेस व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे, तर याच वैशिष्ट्यांसह 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या पॅडची किंमत 27,999 रुपये आहे. 5G नेटवर्क सपोर्ट असलेल्या 8GB + 256GB टॉप मॉडेलची किंमत 29,999 रुपये असेल. Redmi Pad 2 Pro भारतात 12 जानेवारीपासून उपलब्ध होईल. Redmi ने 2,000 रुपयांची बँक ऑफर जाहीर केली आहे.