- Home
- lifestyle
- Raksha Bandhan 2025 : तब्बल 297 वर्षांनी येतोय दुर्मिळ ग्रहयोग, 'या' राशींना मिळणार धनलाभ!
Raksha Bandhan 2025 : तब्बल 297 वर्षांनी येतोय दुर्मिळ ग्रहयोग, 'या' राशींना मिळणार धनलाभ!
मुंबई - तब्बल २९७ वर्षांनी या रक्षाबंधनाला एक दुर्मिळ ग्रहयोग येत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, याचा प्रभाव काही राशींवर चांगला राहणार आहे. त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यांच्यावर धनवर्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी असा योग १७२८ मध्ये
वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार सण आणि शुभप्रसंगी ग्रहांचे दुर्मिळ योग जुळून येतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि त्यांच्या जिवनपद्धतीवर दिसून येतो. यंदा रक्षाबंधनाला २९७ वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून येत आहे. यंदा सूर्य कर्क राशीत, चंद्र मकर राशीत, मंगळ कन्या राशीत, बुध कर्क राशीत, गुरु आणि शुक्र मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असतील. असा योग १७२८ मध्ये जुळून आला होता. यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी ६ ग्रहांचा हा दुर्मिळ योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीतून नफा मिळेल. मुलांकडून शुभ बातमी मिळू शकते. नोकरीत बढती मिळू शकते. भागीदारी व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल. करिअरमध्ये तुम्ही नवीन यश मिळवाल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
कुंभ रास
सहा ग्रहांचा हा दुर्मिळ योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. या काळात तुम्हाला काही शुभ बातमी मिळू शकते. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. परदेश प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी हा ग्रहयोग फायदेशीर ठरू शकतो. अडकलेली कामे आता मार्गी लागतील. तुमची कामे लवकर पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही काही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. व्यवसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात. चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी अनुकूल राहील.

