पोट फुगणे म्हणजे ब्लोटिंग ही एक समस्या सामान्य आहे. यामुळे पोट भरलेले, फुगलेले वाटते. ही समस्या चुकीची खाण्यापिण्याची समस्या आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे निर्माण होते.
मर्यादेपेक्षा अधिक खाल्ल्याने पोटावर दबाव पडला जातो आणि गॅसची समस्या उद्भवते. यामुळे ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
बद्धकोष्ठता, गॅस, मळमळ आणि पोटदुखीसारखी समस्या ब्लोटिंगचे कारण ठरते. योग्य पचनासाठी फायबरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे.
एरंडीच्य तेलामध्ये थोडा संत्र्याचा ज्यूस मिक्स करुन प्या. यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.
एक कप ग्रीन टी आणि त्यामध्ये मध मिक्स करुन प्या. यामुळे ब्लोटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते.
एका ग्लास गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन प्या. यामुळे गॅसची समस्या दूर होते.
आलं आणि मध गरम पाण्यात मिक्स करुन खाल्ल्याने पचनक्रिया सुधारली जाते. यामुळे उलटी, गॅस, ढेकर येणे आणि पोटफुगीची समस्या दूर होते.