- Home
- lifestyle
- Numerology Aug 4 : आज सोमवारचे अंकशास्त्र भविष्य, या राशीच्या लोकांना सकारात्मक बातमी मिळू शकते!
Numerology Aug 4 : आज सोमवारचे अंकशास्त्र भविष्य, या राशीच्या लोकांना सकारात्मक बातमी मिळू शकते!
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्या गणनेनुसार, तुमचा आजचा दिवस कसा असेल हे जाणून घ्या. कोणत्या तारखेला जन्म झालेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल ठरणार आहे आणि कोणासाठी आव्हानात्मक असेल, याचे तपशील खाली दिले आहेत…

अंक १ (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे)
गणेश सांगतात की आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात नफा संभवतो. कौटुंबिक व्यवसायातही सुधारणा दिसून येईल. मात्र आजचा दिवस मेहनतीचा असेल.
अंक २ (२, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेले)
गणेश म्हणतात, आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. मित्रांचा आधार मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल. मानसिक शांतता लाभेल. मात्र थोडा मानसिक तणाव वाढू शकतो.
अंक ३ (३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यवसायात सुधारणा होईल. काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
अंक ४ (४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. खर्च वाढेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात.
अंक ५ (५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेले)
गणेश म्हणतात, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल. व्यावसायिकदृष्ट्या आज ताण असेल. नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.
अंक ६ (६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, आज तुमचे लक्ष गुंतवणुकीकडे राहील. व्यवसायात यश मिळेल. मात्र एखादी वाईट बातमी मिळून मन उदास होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे.
अंक ७ (७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, भविष्याच्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित होईल. समाधान व शांती जाणवेल. आर्थिक व्यवहारात कोणावरही अंधविश्वास ठेऊ नका. घरात आनंदाचे वातावरण राहील.
अंक ८ (८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, ग्रहांची स्थिती अनुकूल असेल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला मिळेल. मात्र आज तुमचा मानभंग होण्याची शक्यता आहे. एकंदर दिवस समाधानकारक असेल.
अंक ९ (९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेले)
गणेश सांगतात, आज तुमचे काही स्वप्न पूर्ण होईल. घरातील वातावरण सुखद असेल. घरगुती कामात वेळ जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा. मात्र आज थोडी आळसपणा जाणवू शकतो.

