Numerology Numbers : वयाच्या 30 नंतर या 3 तारखांना जन्मलेल्या लोकांचं नशीब उजळतं
अंकशास्त्रानुसार काही लोक जन्मतःच नशीबवान असतात, तर काहींना एका ठराविक वयानंतर यश मिळतं. अंकशास्त्रात अशा काही जन्म तारखा सांगितल्या आहेत, ज्यांना वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरच खऱ्या अर्थाने यश आणि पैसा मिळतो.

मूलांक ३
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचा स्वामी गुरु ग्रह आहे. हे लोक लहानपणापासूनच खूप हुशार आणि महत्त्वाकांक्षी असतात. पण विशीत आणि तिशीत त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. अनेकदा त्यांच्या कष्टाचं श्रेय दुसरेच लोक घेतात. पण वयाची ३० वर्षे पूर्ण होताच त्यांचं नशीब अचानक पालटतं. त्यांची आर्थिक स्थिती खूप वेगाने सुधारते.

मूलांक ५
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला तुमचा जन्म झाला असेल, तर तुमचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह बुद्धी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवतो. या तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने थोडे चंचल असतात. सुरुवातीच्या काळात ते कामासाठी एकाच ठिकाणी टिकून राहत नाहीत. पण वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर त्यांच्यात स्थिरता येते आणि ते यशाच्या पायऱ्या चढतात.
मूलांक ८
कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला तुमचा जन्म झाला असेल, तर तुमचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनि देव आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक ८ असलेल्या लोकांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो.
शनिदेवाची कठीण परीक्षा
या तारखांना जन्मलेल्या लोकांना एका ठराविक वयापर्यंत शनिदेवाची कठीण परीक्षा द्यावी लागते. या लोकांना प्रत्येक कामात विलंब आणि अडथळे येतात. पण वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ नक्की मिळतं आणि ते खूप यशस्वी होतात.







