MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Birth Date Numerology : या 4 तारखांना जन्मलेले लोक कोणत्याही कामात लवकर यशस्वी होतात

Birth Date Numerology : या 4 तारखांना जन्मलेले लोक कोणत्याही कामात लवकर यशस्वी होतात

अंकशास्त्रानुसार काही तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये खास गुण असतात. हे लोक कोणत्याही कामात लवकर यशस्वी होतात. काही जन्म तारखा यशासाठी खूप लकी मानल्या जातात. त्या लकी तारखा कोणत्या आहेत?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 28 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लवकर यशस्वी होणाऱ्या जन्म तारखा
Image Credit : Chatgpt

लवकर यशस्वी होणाऱ्या जन्म तारखा

जन्म तारीख आणि व्यक्तीचा स्वभाव यांचा खूप जवळचा संबंध असतो. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जन्म तारखेवरून माणसाचा स्वभाव आणि निर्णय घेण्याची पद्धत ओळखता येते. अंकशास्त्र सांगते की, काही तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि नेतृत्व करण्याचे गुण असतात. हे लोक वेगाने निर्णय घेतात आणि त्यामुळेच ते आयुष्यात लवकर यशस्वी होतात. त्या तारखा कोणत्या आहेत ते पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१ तारखेला जन्मलेले लोक
Image Credit : chatgpt

१ तारखेला जन्मलेले लोक

कोणत्याही महिन्याच्या १ तारखेला जन्मलेल्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. या लोकांमध्ये नेतृत्वाचे गुण ठासून भरलेले असतात. दुसऱ्यांच्या मार्गावर चालण्यापेक्षा हे लोक स्वतःचा वेगळा मार्ग निवडणे पसंत करतात. एखादे काम करायचे ठरवले की ते पूर्ण करूनच हे लोक श्वास घेतात. नोकरी, व्यवसाय किंवा कला क्षेत्र असो, हे लोक संधीचे सोने करतात.

Related Articles

Related image1
Zodiac Signs : वयाच्या 40व्या वर्षानंतर या राशींचे नशीब फळफळते, हाती लागेल ते सोने
Related image2
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात या 5 सवयी
35
५ तारखेला जन्मलेले लोक
Image Credit : chatgpt

५ तारखेला जन्मलेले लोक

कोणत्याही महिन्याच्या ५ तारखेला जन्मलेले लोक खूप चपळ आणि हुशार असतात. नवीन गोष्टी लवकर शिकणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे, हे यांचे वैशिष्ट्य असते. जिथे संधी दिसेल तिथे हे लोक तिचा फायदा घेतात. संवाद, व्यवसाय, मार्केटिंग आणि मीडिया यांसारख्या क्षेत्रात हे लोक आपल्या चपळाईमुळे लवकर ओळख निर्माण करतात.

45
८ तारखेला जन्मलेले लोक
Image Credit : chatgpt

८ तारखेला जन्मलेले लोक

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ८ तारखेला जन्मलेले लोक खूप मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता हे लोक संयमाने पुढे जातात. यांना यश मिळायला थोडा उशीर लागतो, पण ते यश कायम टिकणारे असते. जबाबदारी, शिस्त आणि जिद्दीने काम केल्यामुळे हे लोक करिअरमध्ये खूप मोठ्या पदावर पोहोचतात.

55
९ तारखेला जन्मलेले लोक
Image Credit : chatgpt

९ तारखेला जन्मलेले लोक

कोणत्याही महिन्याच्या ९ तारखेला जन्मलेले लोक खूप धाडसी, आत्मविश्वासी आणि उत्साही असतात. आयुष्यात काहीतरी मोठे मिळवण्याची यांची प्रबळ इच्छा असते. कठीण प्रसंगातही हे लोक कधीच मागे हटत नाहीत. दुसऱ्यांना मदत करण्याचा यांचा स्वभाव असतो. स्वतःच्या टॅलेंटचा योग्य वापर केल्यास हे लोक आयुष्यात खूप वेगाने यश आणि प्रसिद्धी मिळवतात.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Home Remedies : आजीबाईचा बटवा खरंच काम करतो का? कोणते घरगुती उपाय, काय टाळायला हवं?
Recommended image2
Petrichor : पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंधाला एक खास नाव आहे, तुम्हाला माहितीये का?
Recommended image3
Zodiac Signs : वयाच्या 40व्या वर्षानंतर या राशींचे नशीब फळफळते, हाती लागेल ते सोने
Recommended image4
Runny Nose When Crying : रडताना डोळ्यांसोबत नाकातूनही पाणी का येतं? जाणून घ्या खरं कारण
Recommended image5
World Rabies Day 2026 : कुत्रा चावल्यावर घाबरू नका, सर्वात आधी करा 'ही' कामं
Related Stories
Recommended image1
Zodiac Signs : वयाच्या 40व्या वर्षानंतर या राशींचे नशीब फळफळते, हाती लागेल ते सोने
Recommended image2
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात या 5 सवयी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved