MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Sunrise Sunset Point : एकाच जागेवरून सूर्योदय आणि सूर्यास्त! भारतात आहे हे अद्भुत ठिकाण

Sunrise Sunset Point : एकाच जागेवरून सूर्योदय आणि सूर्यास्त! भारतात आहे हे अद्भुत ठिकाण

साधारणपणे आपण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. पण भारतात एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही एकाच ठिकाणी उभं राहून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीचा अनुभव घेऊ शकता.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 18 2026, 04:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
कुठे आहे हे हिल स्टेशन?
Image Credit : Chat GPT

कुठे आहे हे हिल स्टेशन?

सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळेच आपण जेव्हा एखाद्या हिल स्टेशनला फिरायला जातो, तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहण्याचा आनंद घेतो. पण यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्सवर जावं लागतं. पण आपल्या देशात एक अशी अद्भुत जागा आहे, जिथे तुम्ही एकाच ठिकाणी उभं राहून सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहू शकता.

कुठे आहे हे हिल स्टेशन?

हे खास हिल स्टेशन उत्तराखंडमध्ये आहे, ज्याचं नाव आहे लॅन्सडाउन (Lansdowne). लॅन्सडाउनमधील 'टिप इन टॉप' (Tip in Top) हे सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. इथून तुम्हाला चारही बाजूंना पसरलेल्या घनदाट टेकड्या, हिरवीगार दरी आणि दूरवर बर्फाने झाकलेली हिमालय पर्वतरांग स्पष्ट आणि सुंदर दिसते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
अद्भुत सूर्योदय, सूर्यास्त - एकाच ठिकाणी
Image Credit : Chat GPT

अद्भुत सूर्योदय, सूर्यास्त - एकाच ठिकाणी

सकाळी तुम्ही 'टिप इन टॉप' पॉईंटवर पोहोचलात, तर धुक्याच्या चादरीतून आणि डोंगरांच्या आडून हळूवारपणे वर येणारा सोनेरी रंगाचा सूर्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. सूर्याची किरणं जेव्हा हिमालयाच्या बर्फाळ शिखरांवर पडतात, तेव्हा ते दृश्य शब्दांत मांडणं कठीण आहे.

डोळ्यांचं पारणं फेडणारा सूर्यास्त 

त्याच जागेवर उभं राहून तुम्ही संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचाही आनंद घेऊ शकता. संध्याकाळी इथलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं. सूर्य मावळताना आकाशात विविध रंगांची उधळण होते आणि तो डोंगराआड नाहीसा होताना पाहणं खूपच सुंदर वाटतं.

Related Articles

Related image1
Mood Boosting Habits : फक्त ६० सेकंदात तुमचा मूड सुधारतील या १० सोप्या सवयी, रोज नक्की करा
33
एकाच जागेवरून हे कसं शक्य आहे?
Image Credit : Chat GPT

एकाच जागेवरून हे कसं शक्य आहे?

सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे खरंय. पण हा व्ह्यू पॉईंट डोंगरावर अशा ठिकाणी आहे, जिथून ३६०-डिग्री पॅनोरामिक (Panoramic) व्ह्यू मिळतो. त्यामुळे, इथून पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांचं आकाश कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट दिसतं. म्हणूनच एकाच व्ह्यू पॉईंटवरून सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीचा आनंद घेता येतो.

या ठिकाणी कसं पोहोचायचं? 

ठिकाण - टिप-इन-टॉप व्ह्यू पॉईंट, लॅन्सडाउन, पौडी गढवाल जिल्हा, उत्तराखंड.

मार्ग - हे ठिकाण लॅन्सडाउन शहराच्या मुख्य केंद्रापासून फक्त १.५ ते २ किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटक आरामात चालत किंवा गाडीने सहज इथे पोहोचू शकतात. आयुष्यात एकदा तरी हा सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी या जागेला नक्कीच भेट द्यायला हवी.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Smartphone Thumb Pain : सतत फोन स्क्रोल करताय? फोन असा पकडल्यास बोटांना होऊ शकतो धोका
Recommended image2
Winter Hair Care : हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव झालेत? 'या' एका तेलाने करा समस्येवर मात
Recommended image3
Long Necklace : साडीवर तुमचे सौंदर्य दुप्पट करणारे लॉंग नेकलेस डिझाईन्स
Recommended image4
Stylish Kurtis : रोजच्या वापरासाठी स्टायलिश कुर्ती, किंमतही अगदी बजेटमध्ये
Recommended image5
Health Benefits Of Dates : रोज फक्त 2 खजूर खा आणि हे 7 भन्नाट फायदे मिळवा
Related Stories
Recommended image1
Mood Boosting Habits : फक्त ६० सेकंदात तुमचा मूड सुधारतील या १० सोप्या सवयी, रोज नक्की करा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved