मोजून 12 महिन्यात व्हा कर्जमुक्त, जाणून घ्या प्रॅक्टिकल उपाय, असे करा आर्थिक नियोजन
कर्ज घेणं सहाजिक आहे. शिक्षण, आरोग्य, घर, लग्न यासारख्या गोष्टींसाठी आपण कर्ज घेतो. कर्ज घेणं सोपं असतं पण ते फेडताना मात्र अडचणी येतात. योग्य नियोजन नसल्यास कर्ज फेडणं कठीण होऊ शकतं. मग १२ महिन्यात कर्ज कसं फिटेल ते पाहूया.

योग्य नियोजनाने कमी वेळात कर्ज कसं फेडायचं?
सगळेच कर्ज घेतात. काही लोक गरजेसाठी घेतात तर काही लोक शौक पुरवण्यासाठी कर्जात बुडतात. काहींना कर्ज घ्यायची इच्छा नसतानाही, फायनान्स कंपन्या आणि बँका कमी व्याजदरात कर्ज देण्याची ऑफर देतात म्हणून ते कर्ज घेतात. कर्ज घेताना सगळं सोपं वाटतं पण फेडताना मात्र खूप त्रास होतो.
कर्जामुळे आपल्या आयुष्यात ताणतणाव आणि चिंता वाढते. कधीकधी कमी कर्ज घेतलं तरी योग्य नियोजन नसल्यास ते मोठं ओझं बनू शकतं. मग योग्य नियोजनाने कमी वेळात कर्ज कसं फेडायचं ते जाणून घेऊया.
कर्ज सहज कसं फेडता येईल?
आपण करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे नियोजन न करता कर्ज फेडणं. त्याऐवजी आपण कर्जाची स्थिती समजून घेतली पाहिजे. एकूण कर्ज किती आहे? दरमहा किती व्याज भरतोय? कोणाला किती पैसे द्यायचे आहेत? अशा गोष्टींची आणि अल्पकालीन, दीर्घकालीन कर्जांची वेगळी यादी तयार करावी.
एक स्पष्ट परतफेड पद्धत अवलंबावी. १२ महिन्यांत सर्व कर्ज कसे फेडायचे याचे नियोजन करावे. दरमहा किती फेडले तर कर्ज फिटेल याचा आधी अंदाज घ्यावा. त्यामुळे कर्ज सहज फेडता येईल.
आधी जास्त व्याजाचे की कमी व्याजाचे फेडावे?
उत्पन्नानुसार बजेट नियोजन करावे. भाडे, वीज, अन्न, प्रवास यासारख्या आवश्यक खर्चांसाठी काही रक्कम बाजूला ठेवावी. बाहेर जेवण, चित्रपट, खरेदी यासारखे खर्च कमी करावेत. उत्पन्नातील किमान २५-४० टक्के रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरावी.
जास्त व्याजदराचे कर्ज आधी फेडावे
जास्त व्याजदराचे कर्ज न घेणेच उत्तम. जर कर्ज घ्यावेच लागले तर ते आधी फेडावे. क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज आधी फेडावीत. नंतर कमी व्याजदराची बँक कर्ज, वाहन कर्ज फेडावीत.
खर्चाचे नियंत्रण
खर्च नियंत्रणात ठेवायचे असतील तर फक्त आवश्यक वस्तू खरेदी कराव्यात. मासिक अतिरिक्त खर्च कमी करावेत. बाहेर जेवणे, कॉफी, फूड डिलिव्हरी कमी करणे चांगले.
पार्ट टाइम जॉब्समधून अतिरिक्त कमाई करा
कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती आवश्यक आहे का नाही हे तपासा. ईएमआय मध्ये वस्तू खरेदी करणे कमी करा. UPI खर्चावर मासिक मर्यादा ठेवा.
अतिरिक्त उत्पन्न
अतिरिक्त उत्पन्नासाठी प्रयत्न करा. फ्रीलांस काम करा. (कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाइन, ऑनलाइन ट्युशन) संध्याकाळी पार्ट टाइम जॉब्स सोबतच होम बेकिंग, शिलाई काम यासारख्या कामांमधूनही पैसे कमवू शकता. हे अतिरिक्त उत्पन्न कर्ज फेडण्यासाठी वापरा.
वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची पुस्तके वाचा
सर्वसाधारणपणे कर्जाचा आपल्याला ताण येतो आणि चिंता वाढते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या मजबूत राहा. कर्जाबद्दल जास्त विचार केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पण कर्ज मात्र फिटत नाही. त्यामुळे शांत राहा. वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची पुस्तके वाचा.
शेवटी..
कर्जात बुडालो आहोत म्हणून निराश होण्याची गरज नाही. योग्य नियोजन आणि शिस्तीने कमी वेळात कर्ज फेडता येते. मुख्य म्हणजे खर्च नियंत्रणात ठेवणे आणि उत्पन्न वाढवणे यामुळे हे शक्य होते.

