तोंड येण्याची समस्या 3 दिवसात होईल कमी, करा या 2 गोष्टींचे सेवन

| Published : Nov 22 2024, 10:17 AM IST

mouth ulcers

सार

Home remedies for mouth ulcer : तोंड येण्याच्या समस्येमुळे फार वेदना होतात. काही खाता-पिता येत नाही. पण आयुर्वेदात तोंड येण्याच्या समस्येवर काही रामबाण उपाय आहेत. याबद्दलच जाणून घेणार आहोत.

Home remedies for mouth ulcer : तोंड येण्याची समस्या सामान्य बाब आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, शरिरातील पित्ताचे असंतुलन होणे. पण तोंड येण्यामागे अन्य काही कारणे देखील असू शकतात. जसे की, कॅफेनचे अत्याधिक सेवन, धुम्रपान किंवा व्हिटॅमिन बी12, फोलिक अ‍ॅसिडची कमतरता, पोषण तत्त्वांची कमतरता अशा काही गोष्टींचा समावेश आहे. अशातच तुम्हीही तोंड येण्याच्या समस्येचा सामना करताय का? यावर सोपा उपाय जाणून घेऊया...

तोंड आल्यावर लावा तूप


तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या दूर होण्यासह त्वचेला फायदा होते. तोंड येण्याच्या समस्येवर तूप आणि हळदीचे मिश्रण लावू शकता. आयुर्वेदात हळदीला औषधाच्या रुपात मानण्यात आले आहे. हळदीमुळे सूज आणि जळजळ कमी होते.

असा करा तूपाचा वापर

  • एक चमचा तूपामध्ये एक चिमूटभर हळद मिक्स करा.
  • रात्री झोपण्याआधी तोंड आलेल्या भागावर मिश्रण लावा.
  • या उपायाने अवघ्या तीन दिवसात तोंड येण्याची समस्या कमी होईल.

छासचा वापर करा


आयुर्वेदात छासला शरिराला थंडावा देणारे औषध मानले आहे. छास प्यायल्याने पचक्रिया सुधारली जाते, शरिरातील टॉक्सिन बाहेर फेकले जातात आणि त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. पण तोंड येण्याच्या समस्येवर छास रामबाण उपाय आहे. कारण छासमुळे शरिरातील पित्त संतुलित होण्यास मदत होते.

असा करा छासचा वापर

  • छासने गुळण्या केल्यास तोंड येण्याची समस्या लवकर ठीक होऊ शकते.
  • दिवसातून दोन वेळा छासने गुळण्या केल्याने तोंड येण्याची समस्या दूर होऊ शकते.
  • छास प्यायल्याने तोंडाला आलेली सूज, जळजळ आणि दुखणे कमी होऊ शकते.

तोंड येण्याच्या समस्येवर अन्य उपाय
तोंड येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदातील काही उपाय वापरू शकता. यासाठी तोंडाची आतमधून स्वच्छता ठेवावी, ताजी फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. याशिवाय पित्त दूर करणारे डाएटचेही सेवन करावे. जेणेकरुन तोंड येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

सुक्या किंवा रस्सा भाजीत मीठ जास्त पडलेय? वापरा या ट्रिक्स

थंडीच्या दिवसात खा या 3 प्रकारचे मुरांबे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती