सार
हिंदू धर्मात काही पदार्थांचे सेवन करण्यासंदर्भात वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत. अशीच एक मान्यता म्हणजेच, मसूर डाळ मांसाहारासमान मानली जाते. यामुळे ब्राम्हण मसूर डाळीचे सेवन करत नाहीत. यामागील नक्की कारण काय हे जाणून घेऊया...
Hindu Beliefs : हिंदू धर्मातील भोजनावेळी काही पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते. जसे की, कांदा-लसूण जेवणात वापरले जात नाही. या वस्तूंना तामसिक म्हणजेच मांसाहारासमान मानले जाते. विशेष रुपात साधू-संत आणि ब्राम्हण कांदा-लसूण पासून तयार केलेले अन्नपदार्थ खात नाहीत. याशिवाय ब्राम्हण मसूर डाळीचेही सेवन करत नाही. यामागे एक विशेष कारण देखील आहे. खंरतर, ब्राम्हण मसूर डाळ मांसाहार असल्याचे मानतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. नलिन शर्मा यांनी यामागील कारण सविस्तरपणे समाजवून सांगितले आहे तेच जाणून घेऊया...
राहूच्या रक्तापासून निर्माण झाली मसूर डाळ
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. नलिन शर्मा यांच्यानुसार, ज्यावेळी भगवान विष्णूंनी स्वरभानु नावाच्या राक्षसाचे मस्तक छाटले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला नाही. उलट राक्षस दोन भागांमध्ये विभागले गेले. त्याचे मस्तक राहू आणि धड केतू म्हणून संबोधले गेले. मस्तक छाटल्यानंतर जे रक्त सांडले गेले त्यापासून मसूर डाळीची उत्पत्ती झाली असे मानले जाते. याच कारणास्तव साधू-संत आणि वैष्णव धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्ती मसूर डाळीचे सेवन करणे टाळतात.
हे देखील आहे कारण
ज्योतिषाचार्य पं. शर्मा यांच्यानुसार, मसूर डाळीचे सेवन केल्यान मनात उग्रतेची भावना निर्माण होते असे मानले जाते. यामुळेही साधू-संत आणि ब्राम्हण मसूर डाळीचे सेवन करणे टाळतात.
तामसिक पूजेवेळी होतो वापर
मसूर डाळीपासून तयार करण्यात आलेले पदार्थ तामसिक मानले जातात. याशिवाय मसूर डाळीचा वापर तंत्र-मंत्रावेळी केला जातो. यामागील कारण म्हणजे, ज्या ठिकाणी मुख्यत: मांसाहार केला जात नाही तेथे मसूर डाळ आणि त्यापासून तयार केलेल्या अन्नपदार्थांचा वापर मांसाहाराच्या रुपात केला जातो.
आणखी वाचा :
थंडीतील डाएटमध्ये या 5 फूड्सचा करा समावेश, शरीर राहिल आतमधून गरम