सार

लाला रवींद्र नाथ कन्हैया लाल सराफ या दुकानाचे मालक लकी जिंदाल यांनी ही असामान्य लग्नपत्रिका छापली आहे.

ेल्या काही काळात भारतात लग्न समारंभांवर लाखो-करोडो रुपये खर्च केले जातात. एका लग्नासाठी आठवडेभर चालणारा उत्सव असतो. लग्न ठरल्यापासूनच उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. उत्सवाची सुरुवात पाहुण्यांना आमंत्रित करण्यापासून होते. सामान्यतः लग्नपत्रिका जाड कागदावर छापल्या जातात. त्यावर सजावटीसाठी तोरणे लावण्याचीही पद्धत आहे. पण एका लग्नपत्रिकेसाठी लाखो रुपये खर्च करण्याबद्दल ऐकले आहे का? होय, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील एका सोनार व्यापाऱ्याने लग्नपत्रिकेसाठी सोने-चांदीचा वापर केला आहे. 

लाला रवींद्र नाथ कन्हैया लाल सराफ या दुकानाचे मालक लकी जिंदाल यांनी ही असामान्य लग्नपत्रिका छापली आहे. सामान्यतः लोक लग्नपत्रिका फेकून देतात. पण मी छापलेली पत्रिका लोक फेकून देणार नाहीत आणि त्यांचे मूल्य राहील, असे लकी जिंदाल यांनी लोकल १८ ला सांगितले. सोन्या-चांदीचे सौंदर्य आणि वैभव एकत्र आणणाऱ्या लग्नपत्रिका डिझाइन करण्यावर लाला रवींद्र नाथ कन्हैया लाल सराफ यांचे लक्ष केंद्रित आहे. अशा प्रकारच्या आलिशान पत्रिका नवदांपत्यांना आवडत आहेत. 

ग्राहकांच्या पसंतीनुसार लग्नपत्रिकेतील अक्षरांसाठी सोने किंवा चांदीचा वापर केला जातो. १०,००० रुपयांपासून ते ११ लाख रुपयांपर्यंत किमतीच्या मौल्यवान लग्नपत्रिका आज फिरोजाबादमधील लकी जिंदाल यांच्या दुकानात उपलब्ध आहेत. दर्जेदार शुद्ध सोने आणि चांदीचा वापर करून प्रत्येक पत्रिका तयार केली जाते, असा दावा लकी यांनी केला. लग्नसराई जवळ येत असल्याने आतापासूनच ऑर्डर मिळू लागल्या आहेत आणि अशा प्रकारच्या आलिशान पत्रिकांना मागणी वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.