MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Banana Peel Fertilizer : केळ्याची साल फेकून देताय? या ट्रिकने घर फुलं-फळांनी भरेल

Banana Peel Fertilizer : केळ्याची साल फेकून देताय? या ट्रिकने घर फुलं-फळांनी भरेल

आपण सहसा केळं खाऊन साल कचराकुंडीत टाकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का? हीच साल तुमच्या बागेतील झाडांसाठी एक जादूचं काम करू शकते. याच्या वापराने तुमचं घर फुले आणि फळांनी भरून जाईल. जाणून घेऊया ही सोपी ट्रिक.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 11 2026, 12:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
केळ्याचं साल फेकू नका
Image Credit : Meta AI

केळ्याचं साल फेकू नका

केळं खाऊन साल फेकून देणं सामान्य आहे. पण आतापासून ही साल फेकू नका. या सालीचा योग्य वापर केल्यास तुमची बाग फुले आणि फळांनी बहरून जाईल. केळं जसं आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे, तसंच त्याची साल झाडांसाठीही फायदेशीर आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
झाडांसाठी खत म्हणून वापर करा
Image Credit : Getty

झाडांसाठी खत म्हणून वापर करा

केळ्याची साल तुमच्या घरातील फुलझाडं आणि फळझाडांना उत्तम पोषण देते. या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. ही खनिजं झाडांच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करतात. यामुळे झाडांना नैसर्गिकरित्या पोषक तत्वं मिळतात. किचनमधील या कचऱ्याचा तुम्ही झाडांसाठी उत्तम खत म्हणून वापर करू शकता.

Related Articles

Related image1
Left Eye Twitching : महिलांचा डावा डोळा फडफडतोय? जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र
35
केळ्याच्या सालीचं खत
Image Credit : chat gpt

केळ्याच्या सालीचं खत

घरात लावलेल्या फुलझाडांना आणि फळझाडांना केळ्याच्या सालीचं खत दिल्यास झाडं चांगली वाढतात. यामुळे झाडांना जास्त फुले येतात आणि फळंही चांगली लागतात. पेरू सारख्या फळांचा आकार, गुणवत्ता आणि संख्या वाढण्यास मदत होते. घरातच तुम्हाला भरपूर फळं मिळतील.
45
सालीचे तुकडे बारीक करून टाका
Image Credit : pinterest

सालीचे तुकडे बारीक करून टाका

केळ्याची साल थेट झाडांच्या मुळाशी टाकण्याऐवजी एका वेगळ्या पद्धतीने वापरा. सालीचे छोटे तुकडे करून ब्लेंडरमध्ये बारीक करा. नंतर त्यात पाणी मिसळा की तुमचं 'मॅजिक बूस्ट' तयार, हे मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास त्यात आणखी पाणी टाका. आता हे पाणी झाडांसाठी वापरा.

55
झाडांना मिळेल नैसर्गिक पोषण
Image Credit : Pixabay

झाडांना मिळेल नैसर्गिक पोषण

हे द्रावण झाडांच्या पानांवर टाकू नका. कुंडीतील किंवा जमिनीतील झाडाच्या खोडाभोवती मुळांजवळ टाका. पाणी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण तुम्ही घरातील रोपांसाठीही (indoor plants) वापरू शकता. लक्षात ठेवा, हे पाणी रासायनिक खतांना पर्याय नाही, पण ते झाडांना नैसर्गिक पोषक तत्वं नक्कीच देतं. खनिजांचं प्रमाण जास्त असल्यामुळे वाढीसाठी हे खूप उपयुक्त आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Travel Hack : प्रवासाला जाताय? सुटकेसच्या चाकांकडे दुर्लक्ष करू नका, वापरून पाहा ही ट्रिक
Recommended image2
Curry Leaves Vastu : मूठभर कढीपत्ता बदलेल तुमचं नशीब, वास्तुदोष दूर करण्याचे सोपे उपाय
Recommended image3
Soaked Almonds : भिजवलेले बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतील दूर
Recommended image4
Rahu Ketu Transit : राहू-केतूच्या गोचरामुळे दुर्गामातेची कृपा, 'या' 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस!
Recommended image5
फक्त 2 ग्रॅममध्ये रोज घालायला मिळतील हे स्टायलिश कानातले
Related Stories
Recommended image1
Left Eye Twitching : महिलांचा डावा डोळा फडफडतोय? जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved