चेहरा कायम तरुण ठेवायचा आहे? मग हे कोलेजन वाढवणारे आजपासून सुरू करा!
Collagen Boosting Foods: कोलेजनचे उत्पादन कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेषा येतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि त्वचा सैल पडू नये म्हणून, कोलेजनयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे.

चेहऱ्यावर तारुण्य टिकवा, कोलेजन वाढवणारे पदार्थ
चला, कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
लिंबूवर्गीय फळे
संत्री, लिंबू, द्राक्षे यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली लिंबूवर्गीय फळे कोलेजन तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे ही फळे खाल्ल्याने त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि त्वचा तरुण दिसते.
बेरी फळे
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी यांसारखी बेरी फळे खाल्ल्याने कोलेजन वाढण्यास आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.
नट्स आणि बिया
बदाम, अक्रोड, चिया सीड्स, जवस आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारखे नट्स आणि बिया आहारात घेतल्यास कोलेजन वाढण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
किवी
व्हिटॅमिन सी युक्त किवी फळ देखील कोलेजन तयार करण्यास मदत करते.
पालेभाज्या
पालकासारख्या पालेभाज्या आहारात समाविष्ट केल्याने त्वचेचे आरोग्य जपण्यास मदत होते.
डाळिंब
डाळिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे डाळिंबाचा रस आहारात समाविष्ट करणे त्वचेसाठी चांगले आहे.
सफरचंद
व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेले सफरचंद खाल्ल्याने कोलेजन तयार होण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

