दररोज चिकन खाताय? आरोग्याला आहे हानीकारक, वाचा कसा होईल Impact
जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात चिकन खात असाल तर सावधगिरी बाळगा, कारण हे तुमच्या मृत्यूचा धोका वाढवू शकते. एका अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
17

मांसाहारी लोकांच्या थाळीत चिकन हे नेहमीचे पदार्थ आहे. चिकन केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
27
कमी कॅलरी, कमी सोडियम आणि कमी चरबी असलेले चिकन प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. मानवी आहारासाठी आवश्यक असलेले सर्व ९ आवश्यक अमिनो आम्ल त्यात असतात.
37
रेड मीटपेक्षा चिकन हे आरोग्यदायी प्रोटीनचा पर्याय मानले जाते. पण अलीकडील अभ्यासात चिकन प्रेमींसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
47
जास्त चिकन खाणे आणि मृत्यूच्या धोक्यात वाढ यांच्यातील संबंध 'न्यूट्रिएंट्स'मधील एका अभ्यासातून समोर आला आहे.
57
३०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका २७% जास्त असल्याचे आढळून आले आहे. पुरुषांमध्ये हा धोका महिलांपेक्षा जास्त आहे.
67
चिकनच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे रोज किंवा आठवड्यातून किती चिकन खात आहात याची काळजी घ्या.
77
प्रोटीनसाठी चिकनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. टोफू, बीन्स, बिया, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे हे प्रोटीनचे चांगले पर्याय आहेत.

