Chandra Grahan 2025 : या 4 नक्षत्रांमधील लोकांवर काय परिणाम होईल? जाणून घ्या
चंद्रग्रहण १२ राशींबरोबरच नक्षत्रांवरही परिणाम करत असते. विशेषतः शतभिषा, पूर्वभाद्रपदा, आर्द्रा आणि स्वाती या नक्षत्रांवर ग्रहणाचा प्रभाव जास्त असतो. जाणून घ्या कोणता नेमका परिणाम होणार आहे.

चंद्रग्रहण २०२५
या वर्षी दुसरं चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसेल. ब्लड मून पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. आकाशात दिसणारं हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साह आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण काहींसाठी अशुभ ठेलेलं आहे. हे ग्रहण कुंभ राशीतील शतभिषा नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे काही राशी आणि काही नक्षत्रांच्या लोकांवर याचा जास्त परिणाम होईल.
1. शतभिषा नक्षत्र
- या नक्षत्रातील लोकांवर चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम होतो.
- पैशांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
- व्यापाऱ्यांना अचानक अडचणी येतात.
- अपूर्ण कामे आणखी लांबणीवर जातात.
- ताणतणाव वाढतो.
- परदेशात जाण्याची संधी हुकू शकते.
- करिअरमध्ये प्रगती होत नाही.
- शेअरबाजार, लॉटरीत नुकसान होऊ शकतं.
उपाय :
चंद्रदेवाला चांदी आवडते. त्यामुळे चांदीचा दिवा, तांदूळ दान करावेत. तसे शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार दान करावं. मंदिरात जाऊन शांतिपाठ किंवा पूजा करणं शुभ ठरतं.
2. पूर्वाभाद्रपद नक्षत्र
- या नक्षत्रातील लोकांनाही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होतो.
- समाजातील मान-सन्मान कमी होतो.
- प्रत्येक कामात यश मिळणं कठीण होतं.
- आनंद, संपत्ती कमी होते.
- कुटुंबीय, जोडीदाराशी संबंध बिघडतात.
- नोकरीत बढती गमवावी लागते.
- अविवाहितांसाठी विवाह उशीराने होतो.
उपाय :
ग्रहणाच्या आधी किंवा नंतर चंद्रदेवाची पूजा करावी. मंदिरात पूजा करणं अधिक फलदायी ठरतं. ज्योतिषानुसार हे सर्व संकटं दूर करण्यास मदत होतं.
3. आर्द्रा नक्षत्र
- या नक्षत्रातील लोकांनीही ग्रहणकाळात काळजी घ्यावी.
- कोणतेही काम यशस्वी होत नाही.
- व्यवसाय, उद्योगात नुकसान होतं.
- कामासाठी प्रवास करावा लागतो, पण त्यात फायदा कमी आणि तोटा जास्त होतो.
- आरोग्याच्या समस्या वाढतात.
- कर्ज काढावं लागतं.
- घरात शांतता राहत नाही.
उपाय :
ग्रहणाच्या काळात चांदीची अंगठी धारण करणं शुभ ठरतं. त्यामुळे ग्रहणदोष कमी होतो आणि अडचणी दूर होतात.
4. स्वाती नक्षत्र
- या नक्षत्रातील लोकांसाठी चंद्रग्रहण चांगलं नाही.
- जोडीदार, नातेवाईकांसोबत वाद होतात.
- करिअरमध्ये समस्या व अडथळे येतात.
- व्यवसायात नुकसान होऊ शकतं.
- पैशाचं उधार घेणं-देणं अजिबात टाळावं.
उपाय :
या दिवशी दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. शक्य तितकी मदत केल्यास ग्रहणाचे दुष्परिणाम कमी होतात.

