MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Shampoo Ingredients : केस गळती आणि कोंड्यावर कोणता शाम्पू बेस्ट? जाणून घ्या

Shampoo Ingredients : केस गळती आणि कोंड्यावर कोणता शाम्पू बेस्ट? जाणून घ्या

केस गळायला लागले किंवा कोंडा झाला की तुम्ही लगेच शाम्पू बदलता का? शाम्पूमध्ये भरपूर घटक असले म्हणजे तो चांगला, असा तुमचा समज आहे का? मग निरोगी केसांसाठी शाम्पूमध्ये नेमकं काय असायला हवं?

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 20 2026, 07:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शाम्पू बदलल्याने खरंच प्रश्न सुटतो का?
Image Credit : Getty

शाम्पू बदलल्याने खरंच प्रश्न सुटतो का?

केस गळणं, कोंडा, कोरडेपणा किंवा दुभंगलेले केस.. प्रत्येकाची समस्या वेगळी असते. यावर उपाय म्हणून आपण वेगवेगळे शाम्पू वापरतो. पण शाम्पू विकत घेताना तुम्ही त्यातील घटक तपासता का? जास्त घटक असलेला शाम्पू चांगला असतो, असा अनेकांचा गैरसमज असतो. तज्ज्ञांच्या मते, शाम्पूमध्ये किती घटक आहेत यापेक्षा ते घटक तुमची कोणती समस्या दूर करतात, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
जास्त घटक असलेला शाम्पू चांगला असतो का?
Image Credit : Asianet News

जास्त घटक असलेला शाम्पू चांगला असतो का?

आजकाल अनेक जण हेअर केअर प्रॉडक्ट्स विकत घेताना त्यावरील लेबल बारकाईने वाचतात. त्यात कोणते घटक आहेत आणि ते केसांसाठी कसे फायदेशीर आहेत, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. ही चांगली सवय आहे. पण, शाम्पूमध्ये जेवढे जास्त घटक, तेवढा तो जास्त प्रभावी, असा विचार करणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Related Articles

Related image1
Grey Hair : पांढऱ्या केसांची चिंता सतावतेय? या एका पानाने केस गळणे थांबेल आणि पांढरे केसही काळे होतील
35
समस्येनुसार शाम्पूचे घटक बदलतात
Image Credit : Gemini AI

समस्येनुसार शाम्पूचे घटक बदलतात

भृंगराज: आयुर्वेदात भृंगराजला खूप महत्त्व आहे. केस मजबूत करण्यासाठी, तुटण्यापासून वाचवण्यासाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी अनेक उत्पादनांमध्ये याचा वापर करतात. पण केस गळण्याची अनेक कारणं असतात. त्यामुळे फक्त भृंगराज असलेला शाम्पू वापरल्याने केस गळणं थांबेलच, असं नाही.

टी ट्री: डोक्यातील कोंडा आणि खपल्या निघण्याच्या समस्येवर टी ट्री ऑइल फायदेशीर ठरतं. यात क्लिंजिंग आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. पण कोंड्याचं नेमकं कारण ओळखूनच योग्य प्रॉडक्ट निवडायला हवं.

45
कंडिशनरमध्ये हे घटक नक्की पाहा
Image Credit : Getty

कंडिशनरमध्ये हे घटक नक्की पाहा

आर्गन ऑइल: तुमचे केस रखरखीत आणि कोरडे झाले असतील, तर आर्गन ऑइल असलेले प्रॉडक्ट्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. केसांना मऊपणा देण्यासाठी आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कंडिशनरमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतात.

शिया बटर: हेअर ड्रायर, स्ट्रेटनरचा सतत वापर केल्याने किंवा केसांना रंग लावल्याने केस कोरडे होऊन खराब होतात. अशा डॅमेज केसांसाठी शिया बटर खूप उपयुक्त ठरतं. हे केसांमधील ओलावा टिकवून त्यांना मऊ आणि चमकदार बनवतं.

55
शाम्पू विकत घेताना काय काळजी घ्यावी?
Image Credit : Getty

शाम्पू विकत घेताना काय काळजी घ्यावी?

शाम्पू विकत घेताना त्यातील घटकांची यादी मोजत बसू नका. सर्वात आधी तुमचे केस आणि टाळूची (स्कॅल्प) नेमकी समस्या काय आहे, ते ओळखा. त्यानंतर त्या समस्येवर उपाय ठरेल असाच शाम्पू निवडा. केस गळती, कोंडा आणि कोरडेपणा या सर्व समस्यांवर एकच शाम्पू काम करेल, असा विचार करू नका. तसेच, नैसर्गिक घटक असलेला शाम्पू सर्वांनाच सूट होईल असं नाही. काहींना ॲलर्जी असू शकते किंवा काहींची त्वचा संवेदनशील असू शकते, या गोष्टीही लक्षात घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(111.0 ov)351/7
AUSAUS
-
Day 3 - Session 3
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Air Pollution Effects : वायू प्रदूषणामुळे फक्त फुफ्फुसांचेच नाही, तर त्वचेचेही होतेय नुकसान
Recommended image2
Grey Hair : पांढऱ्या केसांची चिंता सतावतेय? या एका पानाने केस गळणे थांबेल आणि पांढरे केसही काळे होतील
Recommended image3
Homemade Dishwashing Liquid : फक्त ४ गोष्टी वापरून घरीच बनवा भांडी घासायचं लिक्विड!
Recommended image4
Silver Jewellery Astrology : या ४ राशींच्या लोकांनी चांदी घातल्यास नशीब उजळेल का?
Recommended image5
Patiala Suits : पाहताच प्रेमात पडाल, पाहा हे ब्युटीफुल पटियाला सूट्स!
Related Stories
Recommended image1
Grey Hair : पांढऱ्या केसांची चिंता सतावतेय? या एका पानाने केस गळणे थांबेल आणि पांढरे केसही काळे होतील
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved