कूलर सुरू केल्यानंतरही खोलीतील दमटपणा कायम राहतो? वापरा या 5 टिप्स, वाढेल गारवा

| Published : May 21 2024, 07:39 AM IST

Humidity and Condensation in Coolers

सार

बहुतांश घरांमध्ये उन्हाळ्यात एसीचा वापर केला जात नाही. त्याएवजी कूलरचा वापर करतात. पण कूलर वापरताना काहीवेळेस त्यामधून गारेगार वारा येणे कमी होते. अशातच खोलीतील तापमान थंड होण्याएवजी अधिक दमट आणि उष्ण असल्यासारखेच जाणवते. यावर उपाय काय जाणून घेऊया…

Tech News : सध्या देशातील बहुतांश ठिकाणचे तापमान 40 अंशाच्या पार जाऊन पोहोचले आहे. अशातच नागरिकांना कडक्याच्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. याच उन्हापासून दूर राहण्यासाठी नागरिक घरात एसी किंवा कूलरचा वापर करतात. पण तुमच्या घरात कूलर असूनही थंडावा जाणवत नाही का? किंवा खोलीत दमटपणा जाणवतो का? या समस्या निर्माण होत असल्यास पुढील काही टिप्स नक्की वापरून पाहा.

कूलरमुळे वाढणारा दमटपणा असा करा दूर

  • कूलर सुरू केल्यानंतर खोलीत दमटपणा आणि शरिर कोरडे होण्याएवजी घामाच्या धारा निघत असल्यास व्यवस्थितीत झोपही लागणार नाही. काहीजण कूलर खोलीमध्ये ठेवतात. पण असे कधीच करू नये. कूलर नेहमीच खिडकी, दरवाज्याच्या बाहेर ठेवावा. यामुळे खोलीत दमटपणा टिकून राहणार नाही. खोलीचा दरवाजा बंद केल्यास खोलीतील उष्ण हवा आतमध्येच राहते. अशातच अधिक गरमा होत असल्यास कूलरचे पाणी खोलीत दमट वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरते. यामुळेच कूलर सुरू केल्यानंतर थंड वारा न येता खोलीत दमटपणा वाटतो.
  • खोलीबाहेरील खिडकीजवळ कूलर एखाद्या कारणास्तव ठेवू शकत नसल्यास त्यामध्ये असलेल्या वॉटर पंपला बंद करा आणि केवळ पंखा सुरू कराय पाण्यामुळे काहीवेळेस दमटपणा निर्माण होते.
  • दमटपणा दूर करण्यासाठी तुम्ही कूलर किंवा सिलिंग पंखा अथवा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे सुरू ठेवू शकता. खोलीतील खिडक्या हलक्या उघडा जेणेकरुन दमटपणा दूर होईल. पंखा सुरू केल्यानंतर वारा खोलीत सर्वत्र पसरला जाईल आणि कूलरमधून येणारा वाराही तुम्हाला आराम देईल.
  • तुम्हाला एग्जॉस्ट फॅन लावायचा असल्यास कूलरसोबत तो देखील सुरू करा. रूममध्ये नव्हे तर खोलीत असणाऱ्या बाथरुममधील एग्जॉस्ट फॅन सुरू करू शकता. यामुळेही खोलीतील दमटपणा दूर होण्यास मदत होईल.
  • कूलर मध्यम ते अधिक स्पीडने सुरू ठेवा. यामुळेही खोलीतील उष्ण वातावरण कमी होऊ शकतो. अधिक वारा आल्यानेही दमटपणा दूर होतो.

आणखी वाचा :

उन्हाळ्यात पोटात उष्णता जाणवते? करा या 5 गोष्टींचे सेवन, मिळेल आराम

कलिंगड इंजेक्शन देऊन पिकवलेलं? या 4 टिप्सने ओखळा