10 Stylish and Safe Gold Hoop Earring : शाळेत जाणाऱ्या तुमच्या नातीसाठी सुंदर आणि ट्रेंडी कानातले शोधत असाल, तर 'रोप गोल्ड हूप्स' हा एक उत्तम पर्याय आहे. हे कानातले वजनाला हलके, सुरक्षित आणि स्टायलिश असल्यामुळे मुली रोज वापरू शकतात.

10 Stylish and Safe Gold Hoop Earring : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या नातीसाठी दागिने निवडताना आजी-आजोबा नेहमीच गोंधळात पडते. मुलींना असे काय घालायला द्यावं, जे वजनाला हलकं, सुरक्षित आणि स्टायलिशही असेल? अशावेळी 'रोप गोल्ड हूप्स' (Rope Gold Hoops) हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. या हूप्सचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं डिझाइन पिळलेल्या दोरीसारखं (twisted) असतं. त्यामुळे हे कानातले साधे असूनही खूप आकर्षक दिसतात. सध्या लहान मुली आणि किशोरवयीन मुलींमध्ये हे डिझाइन खूप ट्रेंडिंग आहे. तुम्हीही तुमच्या मुलीसाठी सोन्याचे हूप्स घेण्याचा विचार करत असाल, तर या 10 रोप स्टाइल ट्विस्टेड गोल्ड हूप्स डिझाइन्स नक्की बघा.

क्लासिक ट्विस्टेड रोप हूप्स गोल्ड डिझाइन्स

हे सर्वात साधं आणि क्लासिक डिझाइन आहे. यात सोन्याला हलका पीळ देऊन दोरीसारखा पॅटर्न तयार केला जातो. रोजच्या वापरासाठी हे डिझाइन सर्वोत्तम आहे.

लेटेस्ट मिनी रोप हूप्स डिझाइन

लहान आकाराचे रोप हूप्स लहान मुलींवर खूपच गोंडस दिसतात. यांचं वजन कमी असतं आणि शाळेच्या युनिफॉर्मवरही ते छान दिसतात. शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे.

स्टाइलिश डबल रोप हूप्स

या डिझाइनमध्ये सोन्याच्या दोन पातळ पिळलेल्या तारा एकत्र करून हूप तयार केलं जातं. हे डिझाइन थोडं युनिक दिसतं आणि शाळेतील एखाद्या कार्यक्रमासाठीही घालता येतं.

रोप हूप्स विथ पर्ल

पिळलेल्या सोन्याच्या हूप्समध्ये लहान-लहान मोती (pearl) लावलेले असतात, ज्यामुळे ते अजूनच सुंदर दिसतात. वाढदिवस किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हे डिझाइन उत्तम आहे.

फ्लॅट रोप हूप्स गोल्ड इअररिंग डिझाइन

यात दोरीचं डिझाइन थोडं चपटं आणि रुंद असतं. हे कानातले वजनाला हलके असूनही जास्त चमकतात. रोजच्या वापरासाठी अशा फॅन्सी गोल्ड इअररिंग डिझाइन्स परफेक्ट आहेत. 

थिन रोप गोल्ड हूप्स

पातळ आणि हलके रोप हूप्स रोज घालण्यासाठी सर्वात सुरक्षित असतात. शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी हे सर्वात प्रॅक्टिकल डिझाइन मानलं जातं. तुम्ही हे 18 कॅरेट सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता.

रोप हूप्स विथ चार्म इअररिंग डिझाइन

काही रोप हूप्सना हृदयाच्या (heart) किंवा ताऱ्याच्या (star) आकाराचे छोटे चार्म्स लावलेले असतात. हे डिझाइन मुलांना खूप आवडतं आणि त्यांचा लूक अजूनच क्युट दिसतो. हे जास्त काळ वापरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

टेक्सचर्ड रोप हूप्स

या डिझाइनमध्ये दोरीच्या पॅटर्नसोबत हलकं टेक्स्चरही असतं, ज्यामुळे कानातले जास्त चमकदार दिसतात. फक्त 2-3 ग्रॅम सोन्यात तुम्ही सोनाराकडून हे बनवून घेऊ शकता. 

ओव्हल रोप हूप्स

यामध्ये गोलऐवजी थोडा अंडाकृती (oval) आकार दिला जातो, ज्यामुळे हे डिझाइन थोडं मॉडर्न दिसतं. तुम्ही तुमच्या बजेटनुसार 14 कॅरेट ते 22 कॅरेटपर्यंत हे बनवू शकता. 

सेफ्टी लॉक रोप हूप्स

लहान मुलांसाठी कानातले सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे. सेफ्टी लॉक असलेले रोप हूप्स सहज उघडत नाहीत आणि शाळेसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.