राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी

Share this Video

राहुल गांधी यांनी भाजपच्या बाबतीत ‘अँटी-इन्कम्बन्सी’ का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातचा उल्लेख करत इतर पक्ष आणि नेत्यांना अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो, मात्र भाजपच्या बाबतीत ती दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. मत हे देशाचा पाया असून त्याचे संरक्षण करणे निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मतातून संविधानाला शक्ती मिळते आणि संविधानातून कायदे व संस्था निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका ‘रिग’ होत असल्याची आपल्याला 100 टक्के खात्री असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

Related Video