अभिजीत दिपकेंचा सवाल; गावच्या शाळांना सुविधा कधी?

Share this Video

अभिजीत दिपके यांनी तानाशाही वृत्ती, आंदोलनावरील दबाव आणि धमक्यांवर भाष्य केले. लोकांचा आवाज दाबता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.स्वातंत्र्य दिनापासून गावातील शाळांच्या सुविधांसाठी आंदोलन सुरू करण्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या मूळ गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांना शाळांमध्ये बेंच, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील टीम सदस्य आपापल्या गावात हा उपक्रम राबवणार आहेत.गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी पूर्ण संधी आणि सुविधा मिळाल्याशिवाय स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असे वाटत नाही, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. तिरंगा रॅलीसोबतच ग्रामीण शिक्षण आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी भेडसावणाऱ्या अडचणींकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Video