
योगींच्या नमाज वक्तव्यावर वारिस पठाण संतापले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath यांनी रस्त्यावर नमाज पठणावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.“रस्ते चालण्यासाठी आहेत, नमाजसाठी नाहीत,” असं म्हणत योगींनी लोकसंख्या नियंत्रण आणि shift मध्ये नमाज पठणाचा उल्लेख केला.यावर AIMIM नेते Waris Pathan यांनी जोरदार पलटवार करत संविधान, secularism आणि सर्व धर्मांना समान अधिकार यावर भाष्य केलं.कांवड यात्रा, पूजा-आरती आणि धार्मिक कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपवर द्वेषाचं राजकारण केल्याचा आरोप केला.तसंच NEET पेपर, पेट्रोल-डिझेल दरवाढ यांसारख्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्यं केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
