
विजय वडेट्टीवारांचा OBC प्रमाणपत्रांवर सरकारला सवाल
विजय वडेट्टीवार यांनी OBC प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्याने प्रमाणपत्र घेतलेले उमेदवार निवडून आल्याचा दावा करत त्यांनी छोट्या OBC समाजांना संधी मिळाली नसल्याचे म्हटले. जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे OBC समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच जात पडताळणी समित्यांवर दबाव आणण्यासाठी महसूलमंत्र्यांवर टीका केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.यासोबतच वडेट्टीवार यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांचा अभाव, Bed ची व्यवस्था, शाळांना मिळणारे अनुदान आणि आदिवासी विभागाच्या बजेटच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले. आश्रमशाळांमध्ये सुधारणा न झाल्यास त्या बंद करून सरकारने जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीबाबत त्यांनी Wait and Watchची भूमिका घेतली. महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरवस्था, मोठ्या पायाभूत प्रकल्पांमधील कथित कमिशनखोरी, खड्डे आणि पूल कोसळण्याच्या घटनांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधींबाबत निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच अमित शाह यांच्या संसदेतल्या उत्तरावर आणि मनोज जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले.