
पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली
पेपरफुटीविरोधातील आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर रिया अहिर यांनी भूमिका मांडली. पंतप्रधानांनी पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधारांना जामीन मिळाल्याचा उल्लेख करत दोषींवर कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली.आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवत राहावे, असे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनआंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आंदोलनाचे राजकारण करू नये, असे स्पष्ट करत आंदोलकांवरील FIR मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या सहकार्याचाही उल्लेख त्यांनी केला.