विनायक राऊतांचा ₹12.5 कोटींच्या मागणीचा दावा

Share this Video

विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तक्रारीतील मजकुराचाच आधार घेत आपण भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणात साडे १२.५ कोटींची मागणी, 3BHK फ्लॅट, कार, मासिक भाडे आणि इतर आर्थिक मागण्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सर्व आरोप ब्लॅकमेल आणि खंडणी उकळण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, चौकशीसाठी जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पूर्ण सहकार्य करू असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणामागे षड्यंत्र असल्याचा दावा करत त्याबाबत पुढे माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video