Vaikunta Ekadasi : मोहिनी अलंकार ते आळवार मोक्ष, दक्षिण भारतातील उत्सवाचे स्वरूप
Vaikunta Ekadasi : वैकुंठ एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला ही एकादशी साजरी केली जाते. या दिवशी स्वर्गद्वार उघडले जाते, अशी धारणा आहे. याची पार्श्वभूमी तसचे दोन दुर्मिळ एकादशींबद्दलची माहिती देत आहोत.

गीतेमध्ये उल्लेख
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, 'महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे.' मार्गशीर्ष संपताच येणारी शुक्ल एकादशी 'वैकुंठ एकादशी' म्हणून ओळखली जाते. ही इतर एकादशींपेक्षा श्रेष्ठ आहे. हा जीवात्म्याचा विष्णूच्या चरणी जाण्याचा प्रवास आहे.
स्वर्गद्वार उघडण्यामागील आध्यात्मिक पार्श्वभूमी
फार पूर्वी मधु आणि कैटभ असुरांना दिलेल्या वरामुळे, वैकुंठ एकादशीला देवाचे दर्शन घेणाऱ्यांना मोक्ष मिळतो. यामुळेच सर्व वैष्णव मंदिरांमध्ये त्या दिवशी पहाटे 'स्वर्गद्वार' उघडले जाते, अशी धारणा आहे.
तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांचे वैशिष्ट्य
श्रीरंगम रंगनाथर मंदिर (भूलोकातील वैकुंठ) : येथे २१ दिवसांचा उत्सव असतो. 'रत्न अंगी' घातलेले नम्पेरुमाळ स्वर्गद्वारातून बाहेर येतात.
तिरुमला तिरुपती : येथे 'वैकुंठ द्वार' दोन दिवस उघडते.
थिरुवल्लिकेनी : येथे पार्थसारथी भगवान सूर्यप्रभेत दर्शन देतात.
पगल पत्तू आणि रापत्तु यांचे तत्त्वज्ञान
दक्षिण भारतात एकादशीच्या आधीचे दहा दिवस 'पगल पत्तू' आणि नंतरचे दहा दिवस 'रापत्तु' म्हणून ओळखले जातात. पगल पत्तूमध्ये भगवान मोहिनी रूपात मोह सोडण्याचा संदेश देतात. रापत्तुमध्ये 'आळवार मोक्ष' होतो.
व्रत करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे
दक्षिण भारतातील प्रथेनुसार, दशमीला एकवेळ जेवून, एकादशीला निर्जल उपवास करावा. रात्रभर जागरण करून विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. द्वादशीला व्रत सोडावे.
फायदे : या व्रताने पापमुक्ती आणि मनःशांती मिळते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
2025 सालातील दुर्मिळ योग
2025 हे वर्ष विशेष आहे कारण या एकाच वर्षात दोन वैकुंठ एकादशी आल्या आहेत. 10 जानेवारी आणि 30 डिसेंबर.
शरणागतीचे तत्त्वज्ञान : जो देवाला पूर्णपणे शरण जातो, त्याच्यासाठी वैकुंठाचे दरवाजे नेहमी उघडे असतात, हाच या दिवसाचा संदेश आहे.

