अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "मला 5 वर्षात 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजनांची घोषणा करताना आनंद होत आहे, यावर केंद्राने 2 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. यावर्षी आम्ही 2 लाख कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी देण्यात आले आहेत.
Budget 2024 Live: बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटी रुपये
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प मांडणार असून समाजातील सर्वच वर्गाला यामधून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी कर सवलत देण्यात येईल, अशीही आशा व्यक्त केली जात आहे.
- FB
- TW
- Linkdin
स्वावलंबनासाठी सरकार डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहे. भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी क्लस्टर तयार केले जातील. 400 जिल्ह्यांतील पिकांचे डिजिटल सर्वेक्षण होणार आहे.
अर्थसंकल्प २०२४ च्या प्रति संसदेमध्ये आणल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
आम आदमी पार्टीच्या खासदारांकडून निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये संजय सिंह आणि राघव चड्डा या दोघांचा समावेश होतो.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे संसदेमध्ये पोहचले आहेत. त्यांनी हे बजेट विकसित भारताच्या रस्त्यावर जाईल असे म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निर्मला सीतारामन यांच्याशी संवाद केला. त्यांनी बजेट संदर्भात संवाद केला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मिठाई खायला दिली.
केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या प्रति संसदेमध्ये पोहचल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सांगताना याबद्दलची माहिती देतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनात पोहचल्या आहेत. अधिकाऱ्यांसोबतची मिटिंग झाल्यानंतर त्या बाहेर आल्या, यावेळी त्यांच्या हातात लाल रंगाची अर्थसंकल्पाची डायरी होती. त्या क्रीम रंगाच्या साडीत आल्या असून ११ वाजता अर्थसंकल्प सांगणार आहेत.