
Tribal Students Protest
खासदार सुप्रिया सुळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. आदिवासी मुलांना अंगणवाड्यांमधून मिळणाऱ्या पोषण आहाराशी संबंधित प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. आदिवासी विद्यार्थ्यांचे 17 दिवसांचे उपोषण सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले आहे.दौंड-पुणे मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेला अतिरिक्त डबे जोडण्याची मागणीही सुळे यांनी मांडली. दौंड-पुणे तसेच बारामती-पुणे DEMU गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी त्यांनी यापूर्वी संसदेतही केली होती.यासोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा मुद्दा, मोहन भागवत यांचे वक्तव्य तसेच देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.