
Vertical Property Card
मुंबईतील सरकारी भाडेपट्ट्यावरील आर्थिक दुर्बल घटकांच्या गृहनिर्माण संस्थांना रेडी रेकनरच्या २५ टक्क्यांऐवजी केवळ ५ टक्के शुल्कात जमिनीची मालकी देणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नागरी निवारा सहकारी संस्थेतील ६,२२५ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ झाला आहे. राज्यातील प्रत्येक पात्र फ्लॅटधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. नोंदणीकृत खरेदीखत आणि इमारतीचा मंजूर नकाशा या दोन कागदपत्रांच्या आधारे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. नियमावलीवर ३० दिवस नागरिकांच्या सूचना घेऊन निर्णय लागू केला जाणार असून त्यासाठी विशेष शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.