
Uday Samant l हिंगोलीत १२७४ कोटींची गुंतवणूक; उदय सामंत
हिंगोलीतील जिल्हा गुंतवणूक परिषदेत १०१ सामंजस्य करार झाले असून १,२७४ कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. यंदा राज्यात स्थानिक उद्योजकांकडून दीड लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोलीत दोन एमआयडीसी आणि हळद क्लस्टरच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिक उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्ञानदास चौगुले आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील कथित मतभेद तसेच राष्ट्रवादीच्या व्हीपवरही त्यांनी भाष्य केले.