
Sushama andhare
बीड जिल्ह्यातील परळी येथे महाविकास आघाडीच्या वतीने सरकारविरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ५ हजार रुपये जमा करून ऐन दिवाळीत त्यांची थट्टा केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. गिरीश महाजन यांना पैसे परत हवे असतील तर भीक मागून जमा केलेले पैसे देऊ, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी सरकारला ५ हजार रुपयांत दिवाळी साजरी करून दाखवण्याचे आव्हान दिले. आंदोलनातून जमा झालेले पैसे सरकारला दिवाळी साजरी करण्यासाठी देणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.