
Supriya Sule
रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा नेत्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांच्या वतीने सुप्रिया सुळे यांनी माफी मागितली. सुनेत्रा पवार या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री असून पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. रोहिणी खडसेंच्या पदातील बदल हा कार्यकाळ संपल्यामुळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पाहिल्यानंतरच पक्षाचा निर्णय जाहीर होईल, व्हीप बजावणे ही नियमित प्रक्रिया असून इंडिया आघाडीच्या नेत्यांशी सातत्याने संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.