
Maharashtra Drought
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष आणि प्रतिनिधींसोबत दुष्काळी परिस्थिती व सरकारी उपाययोजनांवर चर्चा केली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन विधानसभा आणि विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणाला पक्षाचा पाठिंबा असून मतदारसंघ पुनर्रचनेचा मसुदा आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.