
Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. यानंतर शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांवर निष्क्रियतेचे आणि अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याचे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. मंत्रालयात मराठी खाद्यपदार्थ कायम ठेवण्याची भूमिका मांडली. तसेच ओवैसी-चंद्रशेखर आझाद आघाडीवर भाष्य करत रेल्वे स्थानकांवर सर्व सणांना समान सन्मान मिळावा, अशी मागणी केली.