
Shaina NC
दिल्लीत मंत्री संजय शिरसाट यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो वादावर शायना एनसींची बाजू घेतली. शायना एनसी यांनी मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचे स्पष्ट केले असून विरोधक या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणाऱ्या ठाकरे गटावरही टीका केली. सरन्यायाधीशांबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारल्याच्या मुद्द्यावर शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्यांवर आणि न्यायालयात उपस्थित न राहण्याच्या कारणावर प्रश्न उपस्थित केले.