
Sanjay Raut
मराठवाड्यातील २२ लाख शेतकऱ्यांना अद्याप ५ हजार रुपयांची मदत मिळाली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे ४० हजार कोटी मागितले, मात्र केवळ एक हजार कोटी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईतील एसआरए प्रकल्पातून ४० हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप करत ही रक्कम वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, महागाई आणि दुष्काळावर सरकारने लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले.