Sanjay Raut

Share this Video

पुण्यातील न्यायालय परिसरात आणि मुंबईतील सराफाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत असून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक आणि तरुण आंदोलकांना नोटिसा पाठवण्याऐवजी पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यावर लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले. गुन्हेगारांना सरकारमधील लोकांचे संरक्षण असल्याचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Related Video