
Rohit Pawar
देवेंद्र फडणवीस राजकीय घडामोडी आणि अनेक खात्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने गृहखाते दुसऱ्या सक्षम आमदाराकडे द्यावे किंवा गृह राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. डिहायड्रेशनमुळे शरद पवारांची प्रकृती बिघडली होती, मात्र आता ती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांचा मोर्चा सामाजिक असून त्याला राजकीय रंग देऊ नये, असेही ते म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचनेचा मसुदा आल्यानंतरच त्याबाबत भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.