
Rohit Pawar
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील साखर कारखाना चालवायाला घेतला होता, पण तेथील काही कंत्राटदार आणि मजुरांचे पावणेतीन कोटी रुपये थकवल्याचा आरोप होत आहे, तर हे पैसे लवकरात लवकर परत करा नाहीतर कायदेशीर जे काही होईल ते करावे लागेल, असा इशारा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.