Ajit Pawar

Share this Video

शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी आमदारांच्या बैठका बोलावल्याचा आरोप एका आमदाराने केल्याचे कदम यांनी सांगितले. तटकरे यांना राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याची टीका करत अजित पवार यांनी त्यांच्या मुलीला मंत्री आणि मुलाला आमदार केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. अजित पवार यांच्या कथित घातपातात तटकरे यांचा सहभाग आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारकडून चौकशीची मागणी कदम यांनी केली. यापूर्वी तटकरे यांच्या मेहुण्याशी कदम यांचा जाहीर कार्यक्रमात वाद झाला होता. त्यानंतर कदम आणि तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते.

Related Video