
Prakash Raj
संविधान दिनानिमित्त नागपुरात कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या अभिनेते प्रकाश राज यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सौरभ दास यांना परराष्ट्र मंत्रालयाने पाठवलेली नोटीस, मेटा सेन्सॉरशिप आणि सोशल मीडियावरील निर्बंधांवर त्यांनी टीका केली. पीस बॉण्डच्या माध्यमातून शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पेपरफुटी आणि महागाईच्या मुद्द्यांवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.