Nishikant Dubey

Share this Video

मुंबईत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मारुती कंपनीच्या जुन्या व्यवहारांवरून सोनिया गांधी आणि काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. सोनिया गांधी मारुती टेक्निकल सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालक आणि ५० टक्के भागधारक होत्या, असा दावा त्यांनी केला. कंपनीला जमीन, सरकारी सुविधा आणि कंत्राटे देण्याच्या निर्णयांची चौकशी करण्याची मागणी करत पंतप्रधानांनी समिती नेमून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, असे ते म्हणाले. मेटाकडून काँग्रेसची काही खाती हटवल्याच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. तसेच भारताच्या ७ टक्के आर्थिक विकासाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पायाभूत सुविधांचा उल्लेख करत मोदी सरकारच्या कामांचे समर्थन केले.

Related Video