
Navi Mumbai
सुपर स्वच्छता लीग २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशात प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती महापौर सुजाता पाटील यांनी दिली. ४,७५१ शहरांच्या सहभागातून मिळालेल्या या यशाचे श्रेय त्यांनी नागरिक, सफाई कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिले. इंदूरलाही मागे टाकत मिळवलेला पहिला क्रमांक कायम राखण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच गणेश नाईक यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.